शेटफळे ता. 2- शेटफळे (ता. आटपाडी) येथील रानमळा परिसरातील सर्व मतदारांनी एकत्र येत जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला आहे. परिसरातील ५०० ते ७०० मतदारांनी घेतलेल्या या सामूहिक निर्णयामुळे महायुतीच्या उमेदवाराचे मताधिक्य मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
विकासाच्या शब्दाला जागले तानाजीराव पाटील
काही दिवसांपूर्वी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी रानमळा परिसरातील नागरिकांना भेट देऊन रस्ते विकासाचे आश्वासन दिले होते. केवळ आश्वासन न देता, त्यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आणि सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम नुकतेच पूर्णत्वास नेले. रानमळ्यातील वर्षानुवर्षांचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी कृतज्ञता म्हणून महायुतीच्या पाठीशी राहण्याचा निर्धार केला आहेमहायुतीच्या पाठीशी राहण्याचा निर्धार केला आहे.
एकमुखी निर्णयाने राजकीय समीकरणे बदलणार
प्रभाग क्रमांक ३ मधील बहुतांश मतदार रानमळा परिसरात वास्तव्यास आहेत. ५०० ते ७०० मतदारांचा हा गट निर्णायक मानला जातो. तानाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या बैठकीत रानमळ्यातील नागरिकांनी विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येत महायुतीला विजयी करण्याचा संकल्प केला.
या बैठकीप्रसंगी नितीन गायकवाड, रुपेश गायकवाड, विजय गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, तानाजी गायकवाड, सुनील गायकवाड, हणमंत गायकवाड, आप्पा महाराज गायकवाड, बळीराम गायकवाड, पैलवान दादासो गायकवाड, राजू गायकवाड, पैलवान तानाजी गायकवाड, आत्माराम गायकवाड, परशुराम गायकवाड यांसह रानमळ्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा