आटपाडी ता. 1- विभुतवाडी ता. आटपाडी येथे शिवसेनेचा प्रचार करणाऱ्या गाडीवर अज्ञात तरुणांनी हल्ला करून फोडली. या घटनेचे झरे गटात तणावाचे वातावरण बनले आहे. दरम्यान, समाज माध्यमावर हा हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांनी घडवण्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. सांगली जिल्ह्यात सर्वाधिक हॉट लढत निंबवडे जिल्हा परिषद गटात लागली आहे. तिथे भाजपातून समाज कल्याण चे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या पत्नी माधवी पडळकर तर शिवसेनेतून अँड. विद्या मोटे मैदानात उतरल्या आहेत. सकाळी 11 वाजता समाज कल्याणचे सभापती ब्रह्मानंद पडळकर यांची विभूतवाडी सभा होती. यावेळी गावात शिवसेनेच्या उमेदवार विद्या मोटे यांच्या प्रचाराची गाडी गावातून फिरत होती. यावेळी शिवसेनेच्या प्रचाराची गाडी जमलेल्या तरुणांनी अडवून गाडीवर दगड आणि काट्याने जोरदार हल्ला केला. गाडीवर हल्ला होता चालकाने स्वतःला वाचवण्यासाठी पळ काढला. त्यानंतर जमलेल्या अज्ञात तरुणांनी प्रचाराच्या गाडीची काच फोडली. या घटनेने निंबवडे जिल्हा परिषद गटात अधिक तणावाचे वातावरण बनले आहे. दोन दिवसांपूर्वी निंबवडे गटातीलच गळवेवाडी येथेही शिवसेनेची प्रचाराची गाडी अडवून फोडण्याचा प्रकार घडला होता. शिवसेनेची प्रचार गाडी फोडण्याचा हा दुसरा प्रकार घडला त्यामुळे तणावात आणखी भर पडली आहे. दरम्यान गाडीवर हल्ला हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. प्रचार गाडी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आढळून हल्ला केल्याचा आरोप शिवसेनेचे हणमंत मोटे यांनी केला आहे. तर भाजपच्या समर्थकांनी भाजपच्या सुरू असलेल्या प्रचार सभेत प्रचाराची गाडी आडवी लावून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. या घटनेची आटपाडी पोलीस ठाण्यात नोंद केलेली नाही.
करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा