मुख्य सामग्रीवर वगळा

दिघंची गटातील प्रत्येक गावचा प्राथमिक अंदाज

आटपाडी ता. 5- आटपाडी तालुक्यातील दिघंची जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीने सध्या संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले आहे. या गटात शिवसेनेचे दिग्गज नेते व जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांचे सुपुत्र पृथ्वीराज पाटील आणि भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य कलाप्पा कुटे यांच्यात थेट आणि चुरशीची लढत होत आहे. दोन्ही उमेदवारांनी आपापल्या परीने ताकद लावल्याने निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
*गावनिहाय राजकीय गणिते आणि मतदारांचा कल:*
मतदारांच्या प्राथमिक अंदाजानुसार, या गटातील गावांमध्ये संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. काही गावांमध्ये शिवसेनेचे पारडे जड दिसत आहे, तर काही ठिकाणी भाजपाला कौल मिळताना दिसत आहे. *शिवसेनेची (पृथ्वीराज पाटील) मजबूत पकड*:
शिवसेनेसाठी कौठुळी, पुजारवाडी (आटपाडी) , पुजारवाडी ( दिघंची )आणि आवळाई या गावांमध्ये चांगले मताधिक्य मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच पळसखेल मध्ये मध्यम स्वरूपाची आघाडी मिळताना दिसत आहे. तानाजीराव पाटलांचा दांडगा जनसंपर्क आणि पृथ्वीराज पाटलांची तरुणांमधील क्रेझ याचा फायदा शिवसेनेला होताना दिसत आहे.
*भाजपाची (कलाप्पा कुटे) स्थिती*
भाजपचे उमेदवार कलाप्पा कुटे यांना राजेवाडी गावातून चांगले मताधिक्य मिळण्याची चिन्हे आहेत. देशमुखवाडीतही भाजपाला अल्प आघाडी मिळू शकते. दिघंची या मुख्य गावात भाजपला अल्प आघाडी मिळण्याची शक्यता मतदारांनी वर्तवली आहे, मात्र येथे शिवसेनेने ताकद लावल्याने कदाचित शिवसेना अल्प मताधिक्य घेऊ शकते.   
*काटे की टक्कर असलेली गावे(बरोबरी)*
विठलापूर, लिंगीवरे आणि उंबरगाव या गावांमध्ये दोन्ही उमेदवारांना समान संधी आहे. या गावातील मतदारांचा अंतिम कौलच या निवडणुकीचा निकाल ठरवण्यासाठी निर्णायक ठरणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते