मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

करगणी गणात गावनिहाय उमेदवारांना पडलेली मते

पहिल्या फेरी खरसुंडी गटात कोण आघाडीवर

पहिल्या फेरीत खरसुंडी जिल्हा परिषद गटात पडलेली खालील प्रमाणे मते जयदीप भोसले-- 4958 चंद्रकांत भोसले -3118----1840 चे मताधिक्य जयदीप भोसले यांना

आटपाडी तालुक्यात जिल्हा परिषद ा निवडणुकीची अशी होणारा मतमोजणी

आटपाडी ता. 8- आटपाडी तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गणांसाठी पार पडलेल्या मतदानाची मोजणीची  जय्यत तयारी पूर्ण केली असून 19 टेबल्सवर ही प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामध्ये एका टेबलावर टपाली आणि इतर 18 टेबलावर ईव्हीएम मशीन मतदानाची मोजणी केली जाणार आहे.  साधारण चार तासात सर्व निकाल स्पष्ट होतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी  समाधान शेंडगे आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शीतल बंडगर यांनी दिली.  मतमोजणीसाठी एकूण 19 टेबल्सची व्यवस्था केली आहे. यापैकी 18 टेबल्सवर ईव्हीएम  मशीनमधील मतांची मोजणी होईल, तर एक टेबल टपाली मतपत्रिकेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. संपूर्ण चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समितीची मतमोजणी प्रक्रिया एकूण 11 फेऱ्यांमध्ये पार पडणार आहे.  खरसुंडी जिल्हा परिषद गटात पासून मतमोजणीची सुरूवात केली जाणार. त्यानंतर अनुक्रमे करगणी, दिघंची आणि  सर्वात शेवटी निंबवडे गटांची मतमोजणी केली जाईल. साधारण एका गटाची मतमोजणी चार फेऱ्यात पूर्ण होईल. त्यासाठी एक तास वेळ जाऊ शकतो. चारही गटाची मतमोजणी दुपारी दोन पर्यंत पूर्ण होईल, असा प्राथ...

दिघंची गटातील प्रत्येक गावचा प्राथमिक अंदाज

आटपाडी ता. 5- आटपाडी तालुक्यातील दिघंची जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीने सध्या संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले आहे. या गटात शिवसेनेचे दिग्गज नेते व जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांचे सुपुत्र पृथ्वीराज पाटील आणि भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य कलाप्पा कुटे यांच्यात थेट आणि चुरशीची लढत होत आहे. दोन्ही उमेदवारांनी आपापल्या परीने ताकद लावल्याने निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. *गावनिहाय राजकीय गणिते आणि मतदारांचा कल:* मतदारांच्या प्राथमिक अंदाजानुसार, या गटातील गावांमध्ये संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. काही गावांमध्ये शिवसेनेचे पारडे जड दिसत आहे, तर काही ठिकाणी भाजपाला कौल मिळताना दिसत आहे. * शिवसेनेची (पृथ्वीराज पाटील) मजबूत पकड*: शिवसेनेसाठी कौठुळी, पुजारवाडी (आटपाडी) , पुजारवाडी ( दिघंची )आणि आवळाई या गावांमध्ये चांगले मताधिक्य मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच पळसखेल मध्ये मध्यम स्वरूपाची आघाडी मिळताना दिसत आहे. तानाजीराव पाटलांचा दांडगा जनसंपर्क आणि पृथ्वीराज पाटलांची तरुणांमधील क्रेझ याचा फायदा शि...

पिंपरी खुर्द मध्ये 'या' दिग्गज नेत्यानेे शिवसेना राष्ट्रवादीला दिला पाठिंबा

आटपाडी ता. 4- पिंपरी खुर्द आणि आंबेवाडीत आज खळबळ उडणारी राजकीय घटना घडली. गावचे माजी उपसभापती व माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचे खंदे कार्यकर्ते रुपेश पाटील आणि आंबेवाडीचे सुनील पुजारी यांनी राष्ट्रवादी–शिवसेना महायुतीचे उमेदवार विनायक मासाळ आणि रामदास सूर्यवंशी यांना आपला खणखणीत पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे पिंपरी आणि आंबेवाडी परिसरात विरोधकांच्या गोटात मोठी अस्वस्थता पसरली आहे. कार्यकर्त्यांचा निर्धार; प्रचारातही आघाडीवर केवळ पाठिंबा देऊन न थांबता, स्वतः प्रचारात आघाडीवर राहून विनायक मासाळ आणि रामदास सूर्यवंशी यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार रूपेश पाटील आणि सुनील पुजारी यांनी व्यक्त केला. या घडामोडींमुळे राजकीय पटलावर मोठी खळबळ उडाली असून महायुतीचे पारडे जड झाले आहे.                                                          पिंपरी खुर्दमध्ये 'भरती'; अनेक प्रमुख कार्यकर्त्यांचा प्रवेश याचवेळी अमित कद...

करगणी जिल्हा परिषद गटाचा गावनिहाय प्राथमिक अंदाज,,,,

आटपाडी (प्रतिनिधी) जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करगणी गटातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून गावनिहाय प्राथमिक अंदाज समोर येत आहेत. या गटात शिवसेना आणि भाजप यांच्यात थेट आणि चुरशीची लढत पाहायला मिळत असून, मतदारांचा कौल कोणाकडे झुकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.                                 *शिवसेनेचे 'वर्चस्व' आणि मताधिक्याची गावे * प्राथमिक अंदाजानुसार, शिवसेनेची पकड अनेक महत्त्वाच्या गावांमध्ये मजबूत दिसत आहे. विशेषतः करगणी, शेटफळे, मासाळवाडी, खानजोडवाडी आणि यपावाडी या गावांमध्ये शिवसेनेला मोठे मताधिक्य मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच पिंपरी गावात मध्यम स्वरूपाचे, तर माळेवाडी आणि तडवळे गावांतून थोड्या मताधिक्याचा कल शिवसेनेच्या बाजूने दिसत आहे. * भाजपाचीची या गावावर भिस्त* दुसरीकडे, भारतीय जनता पक्षालाही बोंबेवाडी गावात भाजपला मोठे मताधिक्य मिळण्याचे संकेत आहेत. माडगुळे गावात मध्यम स्वरूपाचे तर लेगरेवाडी आणि आंबेवाडी या गावांतून भाजपला निसटती आघाडी मिळण्याची च...

माजी मंत्री महादेव जानकर यांनी शिलेदारासाठी वाडीवस्ती पिंजून काढली

आटपाडी ता. ४-आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा आखाडा आता चांगलाच तापला असून, आपल्या एकनिष्ठ सहकाऱ्यांच्या विजयासाठी माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी कंबर कसली आहे. आपल्या शिलेदारांना जिल्हा परिषदेत पाठवण्यासाठी त्यांनी तालुक्यातील गावे आणि वाड्यावस्त्या पिंजून काढल्या असून, एका माजी मंत्र्याची आपल्या कार्यकर्त्यासाठीची ही धडपड पाहून मतदार अक्षरशः भारावून गेले आहेत .                              *रासपाच्या उमेदवारांसाठी मैदानात* खरसुंडी जिल्हा परिषद गटातून सत्यवान गलांडे, दिघंची गटातून संदेश खटके आणि करगणी गटातील रासपाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या उमेदवारांच्या प्रचारार्थ जानकर यांनी स्वतः मैदानात उतरून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. "प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी द्या," असे आवाहन त्यांनी यावेळी केले. वाड्यावस्त्यांवर थेट संवाद: महादेव जानकर यांनी आपल्या दौऱ्यात तळेवाडी, काळेवाडी, हिवतड, मानेवाडी, मेटकरवाडी, गोमेवाडी, अर्जुनवाडी, लेंगरेवाडी, मासाळवाडी,...