आटपाडी - इजराइलला शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी घेऊन जातो म्हणून पुण्यातील भामट्याने सांगोला आणि आटपाडी तालुक्यातील 31 शेतकऱ्यांना 47 लाख 70 हजाराचा चुना लावला आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडून एक लाख साठ हजार रुपये घेऊन त्यांना इजराइल दौऱ्याला न नेहता फसवणूक केल्याची फिर्याद आटपाडी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की आटपाडी आणि सांगोला तालुक्यातील मोठे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा एक व्हाट्सअप ग्रुप होता. या सोशल मीडियाच्या माध्यमातून पुण्यातील महेश भाऊसाहेब कडूस पाटील राहणार गणेश नगर चिंचवड पुणे हा आला होता. दुष्काळी भागातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना इजराइल मधील डाळिंबाची अत्याधुनिक शेती डाळिंबातील तंत्रज्ञान दाखवण्यासाठी म्हणून शेतकरी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करतो असे सांगून नाना गडदे त्यांच्या ३० मित्राकडून प्रत्येकी एक लाख ७० प्रमाणे पैसे घेतले होते. नानासो गडदे यांचे मित्र नाना यशवंत माळी, कल्लाप्पा गडदे सर्व रा.गोडवाडी ता. सांगोला यांच्यासह 29 जणांनी करगणी येथील आयसीआयसीआय बँकेतून महेश भाऊसाहेब कडव यांना पैसे पाठवले. त्यानंतर कडव यांनी शेतकऱ्यांना इजराइलच्या दौऱ्याला नेले नाही तसेच पैसेही शेतकऱ्यांना परत केले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. आज नानासो दादा गदडे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...
खुप सुंदर लेख झाला आहे
उत्तर द्याहटवा