लोकसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीत सध्या खळखळ सुरू झाली आहे. मी मोठा भाऊ, तु छोटा तर आपली ताकद वाढल्याचा दावा करून जास्तीत जास्त जागा आपल्याच पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेच्या शिवसेनेमध्ये रस्सीखेच लागली आहे. त्या निमित्ताने उन्हाच्या तडाख्यात लोकांंंंंंंं्ंंंंंंंंंंंंंंंं्ंंंंंंंंंंंंंंंं्ंंंंंंंंंंंंंंं मनोरंजन सुरू झाला आहे. गेल्या चार वर्षात राज्यात अनेक राजकीय स्थित्यंतरे घडली आहेत. एकेकाळी भाजपाला सोबत घेऊन राज्यभर फिरवलेला उद्धव ठाकरेंची शिवसेना भाजप पासून लांब गेली आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाविकास आघाडी निर्माण केली आहे. या महाविकास आघाडीने लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्धार आणि संकल्प तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेते मंडळींनी अनेक वेळा जाहीर केला आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावर सध्या खल सुरू झाला आहे. एक दोन बैठकाही झाल्या आहेत मात्र अजून जागा वाटपाचे सूत्र स्पष्ट झालेलं नाही. राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. यामध्ये भाजपाचे 27 आणि शिवसेनेचे 18 आणि इतर काँग्रेस व राष्ट्रवादीचे खासदार निवडून आले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटासोबत शिवसेनेचे 18 पैकी 13 खासदार गेले आहेत. सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत पाच खासदार राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली असून राष्ट्रवादी मोठा भाऊ झाला असल्याचे सांगून अप्रत्यक्षपणे जादा जागेवर दावा केला आहे. तर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी 2014 आणि 2019 च्या परिस्थितीवर न जाता सद्यस्थितीचा आढावा घेऊन जागा वाटप कराव, असं म्हटलं आहे. शिवाय 2014 आणि 2019 पेक्षा सध्या पक्षाची ताकद वाढली आहे हेही निदर्शनास आणून दिला आहे तर उद्धव ठाकरे यांनी पूर्वीच्या खासदार असलेल्या 18 ही जागेवर दावा करून उर्वरित जागेची समान वाटणीचा प्रस्ताव ठेवला आहे. अजित पवारांनी सध्या ज्या पक्षाचे जिथे खासदार आहेत त्या जागा सोडून भाजपाचे खासदार असलेल्या जागाचे वाटपावर निर्णय होणे अपेक्षित असल्याचे सांगितले आहे. सध्या तिन्ही पक्षांमध्ये लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी चांगलीच रस्सीखेच लागली आहे. वरिष्ठ नेतेमंडळी त्यांच्या कल्पकतेचा आणि बुद्धिमत्तेचा वापर करून प्रभावीपणे आणि लोकांना पटेल असे मुद्दे मांडून जादा जागेवर दावा करू लागलेत. त्यामुळे तिन्ही पक्षांमध्ये थोडीशी खळखळ सुरू झाली आहे. एक मात्र नक्की तिन्ही पक्ष लांब जाणार नाहीत अशा दृष्टीने बोलताना दिसतात. कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपाला लोकसभेच्या निवडणुकीत चारी मुंड्या चीत करण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी केला आहे.तो तडीस नेण्याच्या दृष्टीने जागा वाटपाच्या बोलण्यात महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी प्रत्येक जागेनिहाय आढावा घेऊ वास्तवाचे भान ठेवून आणि भाजपाला रोखण्यासाठी मागेपुढे करण्याची तयारी ठेवली तरच सुरळीत जागावाटप होईल अन्यथा जागा वाटपाची बोलणी चिघळत गेली तर तिन्ही पक्षांतर्गत कुरघोड्या सुरू होतील आणि त्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीवर दिसेल. सध्या मात्र उन्हाचा तडाका वाढत चाललेला असताना महाविकास आघाडीतील जागावाटपावरून लोकांचे मनोरंजन सुरू झाले आहे. ( नागेश गायकवाड.आटपाडी,)
करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...
K
उत्तर द्याहटवा