निंबवडे जिल्हा परिषद गटातून विद्याताई सचिन मोटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल शक्तीप्रदर्शनासह भव्य रॅली; शिवसेनेची ताकद दाखवत उत्स्फूर्त जनसमर्थन आटपाडी, दि.२१ (प्रतिनिधी)- निंबवडे जिल्हा परिषद गटातून शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून सौ. विद्याताई सचिन मोटे यांनी आपला उमेदवारी अर्ज उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व जल्लोषाच्या वातावरणात दाखल केला. या निमित्ताने शिवसेनेने आपली संघटनात्मक ताकद दाखवत भव्य शक्तीप्रदर्शन केले असून, या रॅलीमुळे संपूर्ण निंबवडे परिसरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आबानगर चौक येथून सामाजिक परिवर्तनाचे प्रेरणास्थान असलेल्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापर्यंत चारचाकी वाहनांची भव्य रॅली काढण्यात आली. शिवसेनेचे झेंडे, फलक, घोषणा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे रॅली लक्षवेधी ठरली. रॅलीदरम्यान 'शिवसेना जिंदाबाद', 'विद्याताई मोटे आगे बढ़ो' अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. रॅलीनंतर सौ. विद्याताई मोटे यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार व अर्पण करून अभिवाद...
गर्जा जय जय महाराष्ट्र माझा.