आटपाडी-- भाजपचा बालेकिल्ला असलेल्या करगणी जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष दादासाहेब हुबाले यांनी तर माडगुळे गणातून दादासाहेब मोटे यांनी समर्थकासोबत जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या उमेदवारीने करगणी व माडगुळे परिसरात राजकीय वातावरण तापले असून भाजपच्या शक्तीचे प्रभावी दर्शन घडले.
दादासाहेब हुबाले तडवळे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सरपंच आहेत. त्यांनी पाच वर्षे गावचे सरपंच पद सांभाळून प्रभावी कामगिरी केली होती. सध्या ते आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत. तसेच गेल्या वर्षभरापासून भाजपाचे तालुकाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. या दोन्ही पदावर त्यांनी प्रभावित कामगिरी केली आहे. बाजार समितीमध्ये प्रभावी विरोधक म्हणून ठसा उमटवला आहे. तर पक्षामध्ये प्रत्येक प्रभागातून बुथबांधणीपासून संघटन मजबूत केले आहे. त्यांनी पक्षाचे कार्यालय आटपाडीत सुरू केले. त्यामुळे तालुक्यातील सर्वच भाजप कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना कामासाठी चांगले ठिकाण उपलब्ध झाले. याचा परिणाम नगरपंचायत निवडणुकीतून दिसून आला आहे. नुकताच त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली समाज कल्याणचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या उपस्थितीत करगणी गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात सातत्यपूर्ण कार्य
करत आपला वेगळा ठसा उमटवला आहे. जनसामान्य नागरिकांच्या समस्या, शेतकरी, महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी यांची सखोल जाण असल्यानेच त्यांनी करगणी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी केली असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा