निंबवडे गटात अहिल्याच्या लेकीने फुंकले रणशिंग! ॲड. विद्या मोटेंच्या शक्तीप्रदर्शनाने विरोधकांना फुटला घाम
आटपाडी तालुक्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या निंबवडे जिल्हा परिषद गटात आज परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. 'अहिल्याच्या लेकीने' म्हणजेच शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार ॲड. विद्या सचिन मोटे यांनी आपला उमेदवारी अर्ज अत्यंत आक्रमकपणे आणि भव्य शक्तीप्रदर्शनाने दाखल केला. या रॅलीने निंबवडे गटातील घराणेशाही चालू केलेल्या प्रस्थापित विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकवली असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. *भव्य रॅली आणि जनसमुदायाचा महापूर*
आज सकाळी महात्मा फुले चौकातून या रॅलीचा प्रारंभ झाला. यावेळी 'अहिल्यादेवी होळकर यांचा विजय असो' आणि 'शिवसेना झिंदाबाद'च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या रॅलीचे मुख्य आकर्षण म्हणजे गटातील तरुण आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग. हजारोच्या संख्येने जमलेल्या या जनसमुदायाने ॲड. विद्या मोटे यांच्या पाठीशी निभर्ळीत ताकद उभी असल्याचे सिद्ध केले.
*आमदार पडळकरांच्या बालेकिल्ल्याला खिंडार?*
या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, आजवर आमदार गोपीचंद पडळकर यांची भक्कम पकड असलेल्या धनगर समाजातील तरुण वर्ग पहिल्यांदाच मोठ्या संख्येने आणि जोशात रस्त्यावर उतरलेला दिसला. पडळकरांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी हा तरुण वर्ग ॲड. विद्या मोटे यांच्या रूपाने एक सक्षम पर्याय म्हणून पुढे आला आहे. समाजातील या तरुणाईच्या आक्रमक पवित्रा पाहून राजकीय विश्लेषकांनी निंबवडे गटात मोठ्या उलटफेरची शक्यता वर्तवली आहे. *विरोधकांचे धाबे दणाणले*
ॲड. विद्या मोटे यांनी केवळ अर्जच भरला नाही, तर आपल्या भाषणातून आणि शक्तीप्रदर्शनातून विरोधकांना थेट आव्हान दिले आहे. "हा लढा सामान्यांच्या हक्कासाठी आणि निंबवडे गटाच्या अस्मितेसाठी आहे," असा संदेश त्यांनी यावेळी दिला. या रॅलीत झालेली तुफान गर्दी पाहून विरोधकांच्या गोटात शांतता पसरली असून, आता ही निवडणूक केवळ एका गटाची न राहता 'स्वाभिमानाची' लढाई बनली आहे.
*महिला शक्तीचा जागर*
गटातील महिलांनी ॲड. मोटे यांचे ठिकठिकाणी औक्षण करून त्यांना शुभाशीर्वाद दिले. राजकारणात उच्चशिक्षित आणि कणखर महिला नेतृत्व समोर येत असल्याने महिला वर्गात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला.
एकूणच, आजच्या या शक्तीप्रदर्शनाने निंबवडे गटातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, ॲड. विद्या मोटे यांनी प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात विरोधकांवर मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा