मुख्य सामग्रीवर वगळा

निंबवडे गटातून विद्यताईा मोटे ेयाचीे उमेदवारी दाखल

निंबवडे जिल्हा परिषद गटातून विद्याताई सचिन मोटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
शक्तीप्रदर्शनासह भव्य रॅली; शिवसेनेची ताकद दाखवत उत्स्फूर्त जनसमर्थन
आटपाडी, दि.२१ (प्रतिनिधी)- निंबवडे जिल्हा परिषद गटातून शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून सौ. विद्याताई सचिन मोटे यांनी आपला उमेदवारी अर्ज उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व जल्लोषाच्या वातावरणात दाखल केला. या निमित्ताने शिवसेनेने आपली संघटनात्मक ताकद दाखवत भव्य शक्तीप्रदर्शन केले असून, या रॅलीमुळे संपूर्ण निंबवडे परिसरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आबानगर चौक येथून सामाजिक परिवर्तनाचे प्रेरणास्थान असलेल्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापर्यंत चारचाकी वाहनांची भव्य रॅली काढण्यात
आली. शिवसेनेचे झेंडे, फलक, घोषणा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे रॅली लक्षवेधी ठरली. रॅलीदरम्यान 'शिवसेना जिंदाबाद', 'विद्याताई मोटे आगे बढ़ो' अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. रॅलीनंतर सौ. विद्याताई मोटे यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार व अर्पण करून अभिवादन केले. समाजातील वंचित, शोषित व कष्टकरी घटकांसाठी संघर्ष करणाऱ्या लोकशाहीरांच्या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवक सेना तसेच निंबवडे जिल्हा परिषद गटातील विविध गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करताना सौ. विद्याताई सचिन मोटे यांच्यासमवेत शिवसेनेचे तानाजीराव पाटील, उदयोजक राहुल हजारे, स्थानिक नेते, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. यावेळी शांततापूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया पार पडली. यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना सौ. विद्याताई मोटे म्हणाल्या की, ही उमेदवारी केवळ माझी वैयक्तिक नसून निंबवडे जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य जनतेची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली दंडेलशाही, हुकुमशाही व दुर्लक्षित विकासाची परंपरा संपवण्यासाठी मी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. जनतेला 'भयमुक्त,
पारदर्शक व विकासाभिमुख नेतृत्व देण्याचा माझा ठाम संकल्प आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, निंबवडे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच आपले प्रमुख ध्येय असून रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, शिक्षण व्यवस्था, महिला सक्षमीकरण तसेच युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम केले जाईल. समोरचे उमेदवार हे माझे विरोधक नसून, खरी लढाई ही जनतेच्या विकासासाठी आहे मात्र जनहितासाठी ठाम भूमिका घेणे आवश्यक असल्यास मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या भाषणात त्यांनी मतदारांना थेट आवाहन करत सांगितले की, मी आज प्रथम उभी आहे; मात्र तुमच्या विश्वासावर आणि पाठिंब्यावरच
मला विजय मिळवायचा आहे. निवडून आल्यानंतरही मी तुमच्यातीलच एक कार्यकर्ता म्हणून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी कायम लढत राहीन. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांकडून टाळ्यांच्या कडकडाटात जोरदार प्रतिसाद मिळाला.
यावेळी उदयोजक राहुल हजारे, आटपाडी नगरपंचायतीचे नगरसेवक बाळासाहेब हजारे, निंबवडेचे लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब मोटे, विभूतवाडीचे लोकनियुक्त सरपंच सुरज
पाटील, हाणमंत मोटे, बिरुदेव खांडेकर यांच्यासह निंबवडे मतदारसंघातील विविध गावांतील मतदार, महिला वर्ग, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमामुळे निंबवडे जिल्हा परिषद गटातील निवडणूक लढतीला अधिक चुरस आली असून, शिवसेनेच्या या शक्तीप्रदर्शनामुळे आगामी निवडणूक प्रचारात बातावरण आणखी तापणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते