आटपाडी ता.१- केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना सन्माननिधी देऊन अल्प प्रमाणात सन्मान केला आहे मात्र यात साठ वर्षांवरील ज्येष्ठांचा कुठेच विचार केला नाही. देशात आणि राज्यात ज्येष्ठांची 25% वर लोकसंख्या आहे. जर का पेन्शन देणार नसाल तर सत्ताधार्यांना घरात बसवू असा खणखणीत इशारा देऊन राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांसह साठ वर्षांवरील ज्येष्ठांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन द्यावी, यासाठी जनता दलाने मंगळवार ता. ११ रोजी तहसील कार्यालयावर आयोजित केलेल्या मोर्चात शेतकरी आणि ज्येष्ठानी सहभागी होण्याचे आवाहन जनता दलाचे तालुका अध्यक्ष आबासो सागर यांनी केले आहे. माजी आमदार शरद पाटील, माजी आमदार रामहरी रुपनवर आणि माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाला जत, आटपाडी, खानापूर, माण, खटाव आणि सांगोला तालुक्यात गाव गावी बैठका घेऊन प्रबोधन सुरू केले आहे. या भागातून मोठ्...
गर्जा जय जय महाराष्ट्र माझा.