आटपाडी ता.३०- आदमापूर ( जि. कोल्हापूर) येथील महाराष्टाचे जागृत देवस्थान संत बाळूमामांच्या लौकीकाला व्यवस्थापन समितीच भ्रष्ट आचरणातून धक्का लावण्याचं काम करत आहे. भ्रष्टाचारात बरबटलेली ही समिती विसर्जीत करून शासनानेच धर्मादाय कायदा आणून धनगर समाजाचे प्रतिनिधित्व असलेली नविन समिती निर्माण करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे केली असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली. आदमापुर जिल्हा्ह्हा््हा्ह्हा्हा्ह्््ह्हा््हा्ह्हा््हा्ह्हा् कोल्हापूर येथील श्री संत बाळूमामा हे महाराष्ट्रात जागृत देवस्थान म्हणून श्रद्धास्थान म्हणून मानले जाते. त्याच्या दर्शनासाठी राज्य देश आणि परदेशातून कोट्यावधी भाविक दरवर्षी येतात तेथे मोठे धार्मिक सोहळे पार पडतात. तेथील व्यवस्थापन समितीच्या भ्रष्ट कारभाराची तक्रार आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या दरबारात मांडले आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची या संदर्भात भेट घेतली. श्री संत बाळूमामा देवस्थानला दर्शनासाठी जगभरातून भाविक मोठ्या श्रद्धेने येतात. येणारे भाविक मंदिराला मोठ्या मनाने देणगी आणि दक्षिणा देतात. सध्या या मंदिराचे व्यवस्थापन कोल्हापूर येथील धर्मादाय उपाआयुक्तकडे नोंदणी असलेल्या समितीकडे आहे. मात्र भ्रष्ट आचरणामुळे कोल्हापूर धर्मादाय सहआयुक्तानी समिती रिक्त केली आहे. मात्र ही समिती काम बघत असून त्यांच्याकडून न सांगण्यासारखे भ्रष्टाचार सुरू आहेत. राज्य, देश आणि परदेशातून येणारे भाविक देणग्या आणि लाखोंची देणगी देतात मात्र त्यांना समिती कसल्याही सुविधा देत नाही. सुविधा देण राहिल उलट भ्रष्टाचाराने ही समिती बरबटली आहे. मंदिराची स्थावर आणि जंगम मालमत्तेवर त्यांनी कब्जा मिळवला असून त्याचा गैरवापर चालू आहे. त्यामुळे या धार्मिक स्थळाला डाग लावण्याचे काम चालू असून ते तात्काळ थांबवणे अत्यंत गरजेचे आहे. कोल्हापूर येथील करवीर श्री. महालक्ष्मी मंदिरात संदर्भात शासनाने विशेष कायदा केला आहे. त्याच धर्तीवर श्री. संत बाळूमामा देवस्थानसाठी कायदा करून नवीन व्यवस्थापन समिती स्थापन करावी. आणि त्यामध्ये धनगर समाजाला प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा