मुख्य सामग्रीवर वगळा

माजी मुख्यमंत्र्याच्या मुलीने घेतला लिंग बदलण्याचा निर्णय

दिल्ली : अमेरिका आणि युरोप सारख्या देशात लिंग बदलने अगदी सामान्य झालं आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्वच क्षेत्रात प्रगती झाली आहे. IVF ने अनेक बदल घडवून आणले आहेत. भारतातही आता लिंग बदलून घेण्याचं प्रमाण वाढलं आहे. अशातच पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांची मुलगी सुचेतना भट्टाचार्य यांनी आपले लिंग बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सुचेतनाला ऑपरेशनद्वारे लिंग बदलून ‘सुचेतन’ बनायचे आहे. यासाठी त्यांनी कायदेशीर सल्लाही घेतला आहे.
सुचेतना भट्टाचार्य यांनी काही दिवसांआधी LGBTQ वर्कशॉप मध्ये भाग घेतला होता. LGBTQ च्या हक्कांसाठी लिंग बदलण्याचे त्यांनी सांगितलं आहे. समाजातील ट्रांज जेंडर असणाऱ्या व्यक्तींच्या होणाऱ्या छळाला त्यांना थांबवायचं आहे म्हणूनत त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सुचेतनाला विश्वास आहे, तिच्या या निर्णयात तिचे घरचे साथ देतील, कारण सुचेतनाच्या वडिलांना, बुद्धदेव भट्टाचार्य यांना याबद्दल लहानपणापासूनच माहित आहे.
लोक लिंग का बदलतात?
जर एखाद्या पुरूषाचं शरीर हे पुरुषाचं असेल आणि मन स्त्रिच असेल याच्याच उलट एखादी स्त्री शरीराने स्त्री असते मात्र तिचं मन मात्र पुरूषासारखं असतं. तेव्हा असे लोक स्वत:वर शस्त्रक्रिया करून आपलं लिंग बदलतात. मात्र लिंग बदलणं हे ऐकायला जितकं अवघड आहे. त्याप्रमाणे ती शस्त्रक्रियाही अवघड आहे.
लिंग बदलण्याची शस्त्रक्रिया
लिंग बदलण्यासाठी संबंधित व्यक्तीला सेक्स सिअसाइनसमेंट सर्जरी (SRS) करावी लागते. याद्वारे त्या शस्त्रक्रिये्च्या मदतीने त्या व्यक्तीचं लिंग बदललं जातं. या शस्त्रक्रियेला. सेक्स सिअसाइनसमेंट सर्जरी (SRS) ला जेंडर रीअसाइनमेंट सर्जरी, जेनिटल रिकंस्ट्रक्शन सर्जरी आणि सेक्स रीअलाइनमेंट सर्जरी नावानेही ओळखलं जातं.
पुरुषाला स्त्री बनण्यासाठी करावी लागणारी शस्त्रक्रिया सोपी आणि कमी खर्चीक आहे. तर स्त्रीला पुरुष बनण्यासाठी जास्त खर्च लागतो. स्त्री पासून पुरुष बनण्याची शस्त्रक्रिया कमी प्रमाणात यशस्वी होतात.
वर्ल्ड प्रोफेशनल एसोसिएशन फॉर ट्रांसजेंडर हेल्थ (WPATH) नुसार, जन्मासोबत मिळालेले लिंग बदलण्याची ही प्रक्रिया सोपी नाही. एखाद्याला लिंग बदलायचे असले तरी त्यासाठी त्याला मानसिक रित्या तयार व्हावे लागते, यासाठी त्याला मनोचिकित्सकाचा सल्ला घ्यावा लागतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते