मुख्य सामग्रीवर वगळा

'मटण खाऊन केसीआर पंढरपूरात', आ.आमोल मेटकरीची सडकून टीका

     मुंबई-तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव महाराष्ट्रात येऊन शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते त्यांच्या बीआरएस पक्षाचं महाराष्ट्रात विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत. याचअनुशंगाने त्याचा सोलापूर दौरा होत आहे. यासाठी ते हैद्राबादवरून निघाले असून त्यांच्याबरोबर 400 ते 600 वाहणांचा ताफा आहे. तर यावेळी त्यांचे अख्खे मंत्रीमंडळच सोबत आहे. ते पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत. यावरून सध्या चर्चा होताना दिसत आहे. तर टीका ही. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी केसीआर यांच्या मेजवाणीचा फोटो ट्विट करत टीका केली आहे. त्यांनी मटनाचा शाही बेत! पंढरी वारिवर असताना मुख्यमंत्री केसीआर हा प्रकार शोभतो का? वारकऱ्यांच्या भावनाशी खेळू नका? पंढरपूर येताना 10 हजार वेळा विचार करा असा सल्ला दिला आहे. तर पंढरीची वारी पवित्र आहे आपल्या अश्या वागण्याने अपवित्र करू नका असं म्हटलं आहे. त्याचबोरबर महाराष्ट्रात तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे आगमन होण्यापुर्वी पैशाच्या जोरावर ठिकठिकाणी मटणाचे बेत आखले जात आहेत. बॅनरवर पांडुरंगाचे फोटो तर मटणावर ताव हाणून पंढरीत आगमन? @TelanganaCMO पंढरीची वारी पवित्र आहे ती अपवित्र करू नका असे म्हटलं आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते