आटपाडी ता.१- येथील बंद माणगंगा साखर कारखाना सुरू करून राष्ट्रवादी काँग्रेसने आटपाडीसह सांगली, सातारा आणि सोलापूर तीन जिल्ह्याचे विकास मुख्य केंद्र बनवावे, अशी मागणी " एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी " या उपक्रमाच्या माध्यमातून घेतलेल्या बैठकीत केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव सादिक खाटीक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीचे स्वागत असिफ खाटीक यांनी केले. यावेळी मनोज भोसले, विनोद बनसोडे, असिफ कलाल,अतुल गायकवाड, प्रकाश पाटील, आप्पासाहेब ऐवळे, अमिर तांबोळी, प्रशांत पोरे, असिफ कुरेशी, अमित खंडागळे, इम्रान शेख आदी उपस्थित होते. बैठकीत माणगंगा साखर कारखाना बंद पडल्यामुळे झालेल्या प्रतिकूल परिणाम वर चर्चा झाली. तो कारखाना पुन्हा सुरू करावा, अशी साऱ्यांनीच अपेक्षा व्यक्त केली. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षाही व्यक्त केली. तसेच खानापूर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार निवडून यावा, यासाठी वाडी-वस्ती पासून पक्ष बांधणीचे काम कार्यकर्त्यांनी करण्याचे आवाहन श्री. खाटीक यांनी केले. आभार रियाज शेख यांनी मानले.
करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा