आटपाडी ता.३०- केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नेतृत्वाखाली भाजप सरकारने नऊ वर्षात सर्व सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून शेतकरी सन्मान या महत्वकांक्षी योजनेपासून जागतिक स्तरावर देशाची मान उंचावेल अशा अनेक योजना राबविल्या असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी @ 9 अभियानांतर्गत येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी आमदार पडळकर यांनी नऊ वर्षात केंद्र सरकारने राबवलेल्या योजनेवर प्रकाश टाकला. तसेच विरोधकांचाही खरपूस समाचार घेतला. यावेळी भाजपच्या ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष विलास काळेबाग, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, अनिल पाटील, जयवंत सरकार, आणि भाजपचे तालुकाध्यक्ष उमाजी सरगर प्रमुख उपस्थित होते. ते म्हणाले,"सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना सन्माननिधी देऊन खऱ्या अर्थाने देश स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदाच शेतकऱ्यांचा सन्मान करून दाखवला आहे. देशातील एक ही माणूस उपाशी राहू नये हाच दृष्टिकोन समोर ठेवून 80 कोटी लोकांना मोफत धान्य वाटप चालू केले. कोरोनाच्या साथीत जगातील प्रगतशील देश हतबल झाले मात्र आपण प्रभावशाली काम करून दाखवले. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणासाठी अठराशे कोटीची आगाऊ तरतूद करून 140 कोटी लोकसंख्येच्या देशात लसीकरण पुर्ण करून दाखवले. यापूर्वी आपला देश वैद्यकीय उपचारासाठी इतर देशातून उपकरणे मागवत होता मात्र आता आपण एन 85 मास्क, पीपीटी किट आणि व्हेंटिलेटर इतर देशांना निर्यात करण्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष पद पहिल्यांदाच भारताला मिळवून दिले". ते म्हणाले,'यापूर्वी आपण प्रगतशील राष्ट्राकडून युद्धाच्या शास्त्राची आयात करत होतो आता आपला देश आयातीच्या यादीतून निर्यातीच्या यादीत पोहोचला आहे. शास्त्रे आयात करणारा देश म्हणून ओळख बनली आहे. देशाच्या पूर्वाचल राज्यात पायाभूत सुविधांची वनवा होती. त्यामुळे चीन कुरघोड्या करत होता. पंतप्रधान मोदींनी पूर्वाचल राज्यात पहिल्यांदा प्रचंड पायाभूत सुविधा उभा करून केल्या आहेत. सैनिकांमध्ये "वन रँक, वन पेंशन' योजना आणली. मेडिकल क्षेत्रात 85 टक्के जागा गुणवत्तेनुसार भरण्याचा निर्णय घेऊन राबवला." ते म्हणाले," आटपाडी तालुक्यात राज्यातील पहिला बंदिस्त पाईपलाईनने शेतीला पाणी देणारा पथदर्शी प्रकल्प राबवून नवा इतिहास घडवला. याचा मतदारसंघातील शेतकऱ्यांना मोठा उपयोग झाला आहे मतदारसंघातूनच पुणे बेंगलोर हा राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे तसेच नवीन शक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित आहे. राजेवाडी तलाव पर्यटन स्थळ घोषित करून तेथे मंगल कार्यालय उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीच सोनिया गांधी आणि त्यांचे जावईच्या आणि अखिलेश यादव यांनी मायावतीनी उभारलेल्या पुतळ्याच्या चौकशीची मागणी केली होती. यात भाजपचा आणि सरकारचा काहीही संबंध नाही. त्या तक्रारीच्या आधारे चौकशी सुरू आहे." यावेळी भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रणव गुरुव, बाजार समितीचे संचालक आबासो पुजारी, शरद काळे, विष्णू अर्जून प्रमुख उपस्थित होते.
करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा