मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

अवकाळी पावसाने आटपाडी तालुक्याला झोडपले

आटपाडी ता.1- गेली सलग तीन दिवस अवकाळी पावसाने आटपाडी तालुक्याला झोडपून काढल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. रब्बी ज्वारी गहू आणि हरभरा पिकांच्या नुकसानी बरोबरच द्राक्ष आणि डाळिंब बागांना पावसाचा जबर फटका बसला आहे.                       आटपाडी तालुक्यात टेंभूचे पाणी आल्याने फळबागा आणि इतर पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रात कमालीची वाढ झाली आहे. यंदा संपूर्ण पावसाळ्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. मुख्य तलाव आणि विहिरी कोरड्या पडत चालल्या होत्या. परतीचा पाऊस जेमतेम झाला. त्यावर रब्बी ज्वारीच्या पेरणी केल्या. तर गेल्या पंधरा दिवसांपूर्वी हरभरा आणि गव्हाची पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. रब्बी पिकांना थंडीची आवश्यकता असते मात्र अचानक गेली तीन दिवस अवकाळी पावसाने आटपाडी तालुक्याला पुरते झोडपून काढले आहे. यंदा पिकांना कसलीही थंडी मिळालेली नाही. पहिल्या दिवसाच्या पावसाने फारसे नुकसान झाले नव्हते. काही ठिकाणी तो उपयुक्त ठरणार होता मात्र पावसात सातत्य राहिल्याने याचा रब्बी पिकांना जबर फटका बसला आह...

मराठा आरक्षणावर प्रश्नी गार्डीत रस्त्यावर टायर पेटवले

विटा--मराठा आरक्षणाचा प्रश्नी खुद्द सत्ताधारी शिंदे गटाच्या आमदाराच्या गावांतच आज सोमवारी जाळपोळ करण्यात आली. सांगली जिल्ह्या तील शिवसेना शिंदे गटाचे एकमेव आमदार अनिलराव बाबर यांच्या गार्डी (ता. खानापूर) येथे "एक मराठा,लाख मराठा," "जय भवानी- शिवाजी", "आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे," आरक्षण द्या नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा घोषणाबाजीत जालन्यामध्ये सरका रातील ज्यांनी लाठीमारीचा आदेश दिला त्यांचा राजीनामा घ्या, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. जालना येथे झालेल्या मराठा समाजाच्या आंदो लनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्ज घटनेचा सर्वत्र तीव्र निषेध करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार अनिलराव बाबर यांच्या गार्डी (ता. खानापूर) येथे फलटण ते सांगली राज्य महामार्गावरील रस्त्यावर टायर्स पेटवून रस्ता रोको करण्यात आला. यावेळी थोडा तणाव निर्माण झाला होता. दोन्ही बाजूंकडे काही काळ वाहनांची रांग लागली. या आंदोलना दरम्यान दस्तुरखुद्द आम दार बाबर यांचे पुतणे राहुल बाबर, सौरभ बाबर, अजित बाबर, उपसरपंच विक्रम बाबर, बालाजी...
आटपाडी ता.3- लेंगरेवाडी ता. आटपाडी येथे काल मध्यरात्री आज्ञा चोरट्यानी धुमाकूळ घातला.  तीन ठिकाणी घरफोडीत महिलांना चाकूचा धाक दाखवून चार लाखाचा सोन्याचा ऐवज आणि ऐंशी हजार रुपयावर डल्ला मारला. या घरफोडीने गावात खळबळ उडाली. तपासात श्वानपथक घटनास्थळीच घुटमुळले. या चोरीची आटपाडी पोलीस ठाण्यात नोंद केली आहे.                 लेंगरेवाडी ता. आटपाडी येथे शेटफळे ते आटपाडी रस्त्यालगत लेंगरेवाडी पाटी जवळ आनंदा लेंगरे पत्नी, आई आणि मुलासोबत राहतात. काल मध्यरात्री अडीच वाजता मित्राकडे दिलेली मेंढी व्यायला झाल्यामुळे ते गेले. ते पाऊण तासात घरी परतले तेवढ्या कालावधीत ही चोरीची घटना घडली. त्यांच्या आई बाहेर सोप्यात झोपल्या होत्या तर पत्नी आत मध्ये होत्या. चोरट्यांची हालचाल कानावर पडल्याने जागे झालेल्या पत्नीला चोरट्यानी चाकूचा धाक दाखवून आणि मुलांना मारण्याची धमकी दाखवून शांत परत झोपायला सांगून चोरी केली. यामध्ये गंठण, बोरमाळ, नेकलेस, लहान मुलांचे दागिने, सोन्याची चैन असे साडेतीन लाखाचे 70 ग्रॅम सोने चोरीला गेले. तसेच डाळिंबाच्या बागेसाठी वर खताचा डोस दे...

लेगरेवाडीत रात्रीत तीन घर फोडया

आटपाडी - लेंगरेवाडी ता. आटपाडी येथे काल मध्यरात्री आज्ञा चोरट्यानी धुमाकूळ घातला.  तीन ठिकाणी घरफोडीत महिलांना चाकूचा धाक दाखवून चार लाखाचा सोन्याचा ऐवज आणि ऐंशी हजार रुपयावर डल्ला मारला. या घरफोडीने गावात खळबळ उडाली. तपासात श्वानपथक घटनास्थळीच घुटमुळले. या चोरीची आटपाडी पोलीस ठाण्यात नोंद केली आहे.                 लेंगरेवाडी ता. आटपाडी येथे शेटफळे ते आटपाडी रस्त्यालगत लेंगरेवाडी पाटी जवळ आनंदा लेंगरे पत्नी, आई आणि मुलासोबत राहतात. काल मध्यरात्री अडीच वाजता मित्राकडे दिलेली मेंढी व्यायला झाल्यामुळे ते गेले. ते पाऊण तासात घरी परतले तेवढ्या कालावधीत ही चोरीची घटना घडली. त्यांच्या आई बाहेर सोप्यात झोपल्या होत्या तर पत्नी आत मध्ये होत्या. चोरट्यांची हालचाल कानावर पडल्याने जागे झालेल्या पत्नीला चोरट्यानी चाकूचा धाक दाखवून आणि मुलांना मारण्याची धमकी दाखवून शांत परत झोपायला सांगून चोरी केली. यामध्ये गंठण, बोरमाळ, नेकलेस, लहान मुलांचे दागिने, सोन्याची चैन असे साडेतीन लाखाचे 70 ग्रॅम सोने चोरीला गेले. तसेच डाळिंबाच्या बागेसाठी वर खताचा डोस देण्या...

ज्येष्ठांच्या पेन्शनसाठी आटपाडीत रस्ता रोको

आटपाडी.- साठ वर्षावरील ज्येष्ठांना केंद्र आणि राज्य सरकारने  अडीच हजार प्रमाणे प्रत्येकी पाच हजार रुपये मासिक पेन्शन द्यावी, या मागणीसाठी येथील पंढरपूर ते कराड राज्य मार्गावर साई मंदिर चौकात रस्ता रोको आंदोलन केले. आंदोलन एक तास चालले. यावेळी आंदोलकांनी पंधरा दिवसांत निर्णय न घेतल्यास लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला.                                साठ वर्षावरील ज्येष्ठांना केंद्र सरकारने अडीच आणि राज्य सरकारने अडीच, अशी पाच हजार रुपये पेन्शन द्यावी, या मागणीसाठी जनता दलाचा गेली बारा वर्षे लढा सुरू आहे. या लढ्याचे केंद्र आटपाडी बनले आहे. आटपाडी शेजारचे सांगोला, माण, खटाव आणि मंगळवेढा तालुक्यात आंदोलने केली आहेत. गेल्या दोन महिन्यापासून पुन्हा नव्याने आंदोलने सुरू केली आहे. यात आटपाडी पोलीस ठाण्यावर मोर्चा आणि नंतर जेलभरो आंदोलन केले होते. त्याची दखल न घेतल्यानेआज रस्ता रोको आंदोलन केले. दुपारी बारा वाजता पंढरपूर ते कराड राज्य मार्गावर साई मंदिर चौकात रस्ता र...

टेंभूच्या पाण्याची मागणी नोंदवण्याचे अहवान

आटपाडी ता. 29- टेंभू योजनेचे खरीप आवर्तन सुरू झाले असून ज्या भागात शेतकऱ्यांना पाणी हवे आहे त्यांनी रितसर लेखी पाणी मागण्याची नोंदणी करावी, असे आवाहन टेभूचे उपविभागीय अधिकारी एस.बी.गियकवाड यांनी केले आहे.                     यंदा कोयनेतील पाणीसाठा लवकर कमी झाल्यामुळे उन्हाळी आवर्तन लवकर बंद केले होते. त्यामुळे अनेक भागातील तलाव आणि ओढ्यावरील बंधारे मागणी करूनही टेंभूच्या पाण्याने भरता आले नव्हते. त्यामुळे पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्या चार दिवसापासून टेंभू योजनेचे पंप सुरू केले आहेत. योजनेचे खरीप आवर्तन सुरू केले आहे. टेंभू योजनेतून खानापूर, आटपाडी, सांगोला, कवठेमंकाळ, तासगाव या तालुक्यात पाणी जाते. ज्या भागात तलावात आणि बंधाऱ्यात पाण्याची मागणी होईल त्या मागणीच्या क्रमाने सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या कार्यालयात पाण्याची लेखी मागणी करावी, असे आवाहन टेंभू विभागाने केले आहे. ज्या भागातून लवकर मागणी होईल त्या क्रमाने पाणी सोडले जाणार आहे.

पारेकरवाडी ग्रामपंचायत मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेत चार हजार टाकणार

आटपाडी ता.29- पारेकरवाडी ता. आटपाडी ग्रामपंचायतीने गावातील वर्षभरात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलींच्या नावाने प्रत्येकी चार हजार रुपये "सुकन्या समृद्धी योजनेत" टाकण्याचा  ऐतिहासिक निर्णय मासिक बैठकीत घेतला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुवर्णा कोकरे होत्या. ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाचे उपक्रमाचे तालुक्यातून कौतुक केले जात आहे.                                          ग्रामीण भागात मुलीच्या जन्मानंतर अजूनही काही पालकात नाराजी पसरते. मुलगी ही पालकांना ओझं वाटते. मुलीचे शिक्षण आणि विवाहाचा खर्च याच सर्वात मोठा कोडे पालकाच्या समोर असतात. त्यामुळेच पारेकरवाडी ग्रामपंचायतीने मुलीच्या विवाहाचे ओझे पालकावरचे कमी व्हावे आणि मुलीच्या जन्माचे स्वागत करावे या हेतूने वर्षभरात गावात नवीन जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावाने "सुकन्या समृद्धी योजनेत" चार हजार रुपये टाकण्याचा ऐतिहासिक निर्णय ग्रामपंचायतच्या मासिक बैठकीत सर्व सदस्यांनी घेतला आहे सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच ...