मुख्य सामग्रीवर वगळा

पारेकरवाडी ग्रामपंचायत मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेत चार हजार टाकणार

आटपाडी ता.29- पारेकरवाडी ता. आटपाडी ग्रामपंचायतीने गावातील वर्षभरात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलींच्या नावाने प्रत्येकी चार हजार रुपये "सुकन्या समृद्धी योजनेत" टाकण्याचा  ऐतिहासिक निर्णय मासिक बैठकीत घेतला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुवर्णा कोकरे होत्या. ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाचे उपक्रमाचे तालुक्यातून कौतुक केले जात आहे.                                          ग्रामीण भागात मुलीच्या जन्मानंतर अजूनही काही पालकात नाराजी पसरते. मुलगी ही पालकांना ओझं वाटते. मुलीचे शिक्षण आणि विवाहाचा खर्च याच सर्वात मोठा कोडे पालकाच्या समोर असतात. त्यामुळेच पारेकरवाडी ग्रामपंचायतीने मुलीच्या विवाहाचे ओझे पालकावरचे कमी व्हावे आणि मुलीच्या जन्माचे स्वागत करावे या हेतूने वर्षभरात गावात नवीन जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावाने "सुकन्या समृद्धी योजनेत" चार हजार रुपये टाकण्याचा ऐतिहासिक निर्णय ग्रामपंचायतच्या मासिक बैठकीत सर्व सदस्यांनी घेतला आहे सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुवर्णा कोकरे होत्या. त्यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जाणार असून एक जानेवारीपासून जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीच्या नावावर ग्रामपंचायत चार हजार रुपये जमा करणार आहे. हे पैसे "सुकन्या समृद्धी योजनेत" गुंतवले जाणार आहे. मुलीच्या अठरा वर्षानंतर ते काढता येणार आहेत. तसा मासिक सभेच्या बैठकीत एकमताने निर्णय घेतला आहे. यावेळी उपसरपंच मयुरी पारेकर, सदस्य प्रकाश बरकडे, आबासाहेब कोकरे, प्रकाश हांडे, नारायण कोकरे, विश्वनाथ बाबर आणि ग्रामसेवक सतीश जाधव प्रमुख उपस्थित होते.                

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते