मुंबई- यंदा दक्षिण पश्चिम मान्सूनने ट्रेंड खूपच बदलला आहे. ज्या वेगाने पाऊस पडायला हवा होता तो आत्ता पर्यंत तरी दिसलेला नाही. तज्ज्ञानी या गोंधळाला हवामान बदल किंवा चक्रीवादळ बिपरजॉयला जबाबदार धरलं आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यातही अपेक्षित पाऊस दिसत नाही, तसा अंदाज व्यक्त केला आहे मान्सूनचा कल किती बदलत चालला आहे. रविवारी मान्सूनचे दिल्ली आणि मुंबईत एकाच वेळी आगमन झाले, असे होत नाही पण ते यंदा झाल. 21 जून 1961 नंतर यंदा रविवारीच मान्सूनने दोन्ही महानगरात आगमन केले. यंदा मान्सून दोन दिवस आधीच दिल्लीत दाखल झाला, तर मुंबईत जवळपास दोन आठवडे उशीर आला. आता प्रतीक्षा आहे ती संपूर्ण देशात मान्सूनने येण्याची. खरी चिंता जुलैची आहे, ज्यामध्ये एल-निनो येण्याचा धोका आहे. आजपर्यंत, मान्सूनची उत्तर सीमा पोरबंदर, अहमदाबाद, उदयपूर, नारनौल, फिरोजपूरमधून जातो. IMD म्हणते की तो पंजाब, गुजरात, राजस्थानचा आणखी काही भाग, हरियाणाचा उर्वरित भाग आणि त्याच्या लगतचा भाग व्यापण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात प...
गर्जा जय जय महाराष्ट्र माझा.