आटपाडी ता.२५- लेंगरेवाडी ता. आटपाडी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये "दोस्ती इंग्लिशी" हा सकाळ माध्यम समूहाचा शालेय विद्यार्थ्यांच्यासाठी असलेला उपक्रम प्रभावीपणे राबवला जातोय. यामुळे लेंगरेवाडीतल्या पोरांचे इंग्रजी विषय असलेली भीती कमी होत चालली आहे. लेंगरेवाडी ता. आटपाडी येथे
आटपाडी शिक्षण संस्थेचे 'न्यू. इंग्लिश स्कूल' माध्यमिक विद्यालय सुरू आहे. लेंगरेवाडीतील अनेक जण मेंढपाळ आणि ऊस तोडीसाठी स्थलांतर करत असतात. त्यांची मुलं या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनात इंग्रजी विषय भीती असते. या विद्यार्थ्यांची भीती दूर करून इंग्रजी विषय चांगला व्हावा या दृष्टिकोनातून सकाळ माध्यम समूहाने दैनिक सकाळ पेपरमधून "दोस्ती इंग्लिशी"हा उपक्रम सुरू केला आहे. तोच उपक्रम मुख्याध्यापक डी आर मोहिते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या शाळेमध्ये सुरू केला आहे. विद्यार्थ्यांच्या मनातून इंग्रजी विषय असलेली भीती काढून टाकण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. "रायटिंग, स्पिकिंग लर्निंग" या धरतीवर हा उपक्रम राबवण्यात आला आहे. यासाठी दै. सकाळ पेपरची मदत घेतली आहे. वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होणारे इंग्रजी विषयाची कात्रणे संग्रहित करून त्याचे वाचन लेखन रोज करून घेतले जाते. तसेच आटपाडीतून पेपर नेऊन त्यातील इंग्रजी विषय असलेले पाठ विद्यार्थ्यांना शिकवले जातात. विद्यार्थ्याकडून त्याची तयारी करून घेतली जाते. मुख्याध्यापक आर. डी मोहिते, बी.एस. बागल, सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा