मुख्य सामग्रीवर वगळा

दुर्लक्ष कराल तर महागात पडेल,,,, केंद्र आणि राज्य सरकारला आटपाडीत यांनी दिला इशारा

आटपाडी -- आमच्या संयमाचा अंत पाहू नका. आमची ही राज्यात पंचवीस टक्केवर लोकसंख्या आहे. तेव्हा आमच्याकडे दुर्लक्ष कराल तर महागात पडेल. केंद्र आणि राज्य सरकारने या आठवड्यानंतर सुरू होणाऱ्या अधिवेशनात साठ वर्षांवरील शेतकऱ्यांना मासिक पाच हजार पेन्शन देण्याचा निर्णय घ्यावा नाही तर दोन्ही सरकारला घरी घालवणार असा खणखणीत  इशारा जनता दलाने आज तहसील कार्यालयावर काढलेल्या मोर्चात ज्येष्ठांनी दिला. तसेच अधिवेशनात दहा दिवसांत निर्णय न झाल्यास 25 तारखेला सहा तालुक्यात जेलभरो आणि 31 तारखेला पुन्हा आटपाडीत महाजेलभरो आंदोलन करण्याचा निर्वाणीचा इशारा दिला.                                  साठ वर्षावरील ज्येष्ठ शेतकरी महिला आणि पुरुषांना केंद्र शासनाने अडीच आणि राज्य सरकारने अडीच असे पाच हजार रुपये मासिक पेन्शन देण्याच्या मागणीसाठी जनता दलाचे तालुका अध्यक्ष आबासो सागर यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. बस स्थानकापासून मोर्चाची सुरुवात झाली. मुख्य पेठेतून घोषणा देत पक्षाचा झेंडा फडकवत ज्येष्ठ महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यावर आले होते. या मोर्चात वयोवृद्ध महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात जनता दलाचे झेंडे आणि गळ्यात जनता दलाचे उपरणे घालून उस्फुर्तपणे सहभागी झाली होती. अनेक महिला आणि ज्येष्ठ सोबत जेवणाचे गाटूड घेऊन आली होती.  मोर्चात पलूस, खानापूर,आटपाडी, सांगोला, मंगळवेढा आणि माळशिरस  तालुक्यातून शेतकरी आले होते. जनता दलाचे प्रदेश अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, तालुका अध्यक्ष आबासो सागर यांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करताना मार्गदर्शन केले. यावेळी जनार्दन गोंधळी, जगन्नाथ माने, माणिकराव पांढरे, रामचंद्र कोळेकर, बाजीराव सरक, सुवर्णा सरक आदी उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तेरा वर्षे या मागणीसाठी लढा सुरू आहे. त्याची दखल घेऊन सरकारने शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान निधी सुरू केला मात्र यातून साठ वर्षावरील जेष्ठांचा विचार केला नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. या आठवड्यात केंद्र आणि राज्य सरकारची अधिवेशन सुरू होणार आहे. या दोन्ही अधिवेशनात दोन्ही सरकारने महाराष्ट्रातील ज्येष्ठांना पेन्शन देण्याचा निर्णय घ्यावा अन्यथा सरकारला येणाऱ्या निवडणुकीत मतपेटीतून दणका देण्याचा एक मुखाने निर्णय घेतला. शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केल्यास महागात पडेल असा इशारा दिला. याच अधिवेशनात निर्णय झाला तर होईल अन्यथा परत होणार नाही. त्यामुळे दहा दिवसात निर्णय न झाल्यास पुन्हा पंचवीस तारखेला आटपाडी, पलूस, खानापूर,सांगोला, मंगळवेढा आणि माळशिरस या तालुक्याच्या पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून जेलभरो आंदोलन करण्याचे ठरले. त्या त्या तालुक्यातील ज्येष्ठ आणि पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून स्वतःला अटक करून घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर ही निर्णय न झाल्यास 31 तारखेला आटपाडीत मोर्चा काढून महाजलभरो आंदोलन करण्याचे ठरले. आंदोलनकर्त्यांनी ज्येष्ठांना शेतकरी सन्मान निधी देण्याऐवजी शेतकरी पेन्शन योजनेतून दरमहा पेन्शन द्यावी, अशी मागणी केली. सरकारने हिम्मत असेल तर सन्मान निधी शब्द काढून शेतकरी पेन्शन योजना जोडावा, अशीही मागणी केली. केंद्र आणि राज्य सरकारवर आंदोलनकर्त्यांनी टीकेचा भडीमार केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते