मुख्य सामग्रीवर वगळा

आटपाडीचा महसूल विभाग "ॲक्शन मोडवर", एकाच रात्री तीन वाहनावर केली कारवाई

   आटपाडी ता.6- माणगंगा नदी पात्रातून वाळूची चोरी करून त्याची वाहतूक करताना बोबेवाडी ते माडगूळ रस्त्यावर दोन ट्रॅक्टर आणि एका टेम्पोवर आटपाडी महसूल विभागाने कारवाई केली. या कारवाईत तीनही वाहने आणि त्यामधील चार ब्रास वाळूचा साठा जप्त केला आहे.                                                    बोबेवाडी येथून जाणाऱ्या माणगंगा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी केली जाते. याकडे प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष झालेले आहे. इथे होणाऱ्या वाळू तस्करीच्या अनेक तक्रारी मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचल्या आहेत तरीही नदीतील वाळू चोरी थांबवण्यात महसूल प्रशासनाला अपेक्षित यश मिळवता आलेले नाही.                                      सध्या आटपाडी महसूल विभाग ॲक्शन मोडवर आला आहेत. आटपाडीच्या तहसीलदार बी.एस. माने यांच्या आदेशाने आटपाडीचे तलाठी सुधाकर केंगार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पथकाने मध्यरात्री बोंबेवाडी ते माडगूळ रस्त्यावर वाळूची वाहतूक करणाऱ्या तीन वाहनावर कारवाई केली.  हे पथक माणगंग नदी पात्र परिसर, बोबेवाडी आणि माडगळे परिसरात मध्यरात्री गस्त घालत होते. माणगंगा नदीपात्रातून वाळू भरून वाहने येत असल्याची  या पथकाला गुप्त खबर लागली होती. माडगूळ रस्त्यावर या पथकाने पहिल्यांदा समोरून आलेला ट्रॅक्टर थांबवला. त्यात या पथकाला वाळू आढळून आली. त्यानंतर टेम्पो आणि नंतर ट्रॅक्टर पथकाला सापडला. रात्री गस्त घालत असताना त्यांना दोन ट्रॅक्टर आणि एक टेम्पो वाळूची वाहतूक करताना सापडली. ही कारवाई पहाटेपर्यंत सुरू होती. महसूल पथकाच्या या कारवाईने वाळू तस्कराची मध्यरात्रीची पळापळ आणि धावपळ चालली होती. यातील बोंबेवाडी येथील गणेश बाबासाहेब पवार यांच्या मालकीचा नंबर नसलेला ट्रॅक्टर वाळूसह जप्त केला आहे. बोंबेवाडी येथीलच महेश बाळासाहेब कारंडे यांचा नंबर नसलेला टेम्पो आणि दोन ब्रास वाळूसह प्रशासनाने ताब्यात घेतला आहे. तर आंबेवाडी येथील विष्णूचंद्र मेटकरी यांच्या मालकीचा नंबर नसलेला ट्रॅक्टर ट्रॉली आणि त्यातील वाळू जप्त केले आहे. महसूल विभागाने वाळू तस्करावर कारवाईचा बडगा उभारल्याने तस्करात खळबळ उडाली आहे. महसूल विभागाने कारवाईत सातत्य ठेवावे, अशी नदीकाठच्या शेतकऱ्यांची अपेक्षा आणि मागणी आहे.                    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते