आटपाडी ता.१२- आटपाडी नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या वाड्यावस्तीवर नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन देऊन पाण्याची आणि स्ट्रीट लाईटची सुविधा तातडीने द्यावी, अशी मागणी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगली जिल्हा महिला आघाडीच्या उपाध्यक्ष अनिता पाटील आणि महिलांनी मुख्यअधिकारी यांच्याकडे केली. अनिता पाटील आणि महिलांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकाऱी पवन मेहेत्रे यांची भेट घेऊन आटपाडी नगरपंचायती अंतर्गत येणाऱ्या वाडी वस्तीवरील नागरिकांच्या विविध समस्या आणि प्रश्नावर चर्चा केली. अनेक वाडी वस्तीवरील लोकांना नळ कनेक्शन नाहीत. त्यांना नळाचे कनेक्शन देऊन पाण्याची सोय केली जावी, अशी मागणी केली. या मागणीचे निवेदनही दिले. यावेळी सुलक्षणा गेळे, ललिता गेळे ,सुरेखा गेळे ,गंगुबाई गेळे ,सुमित्रा गेळे, सोनम गेळे ,मंगल गेळे , सुरेखा गेळे ,आशाताई कदम , शालन चव्हाण उपस्थित होत्या.
करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा