मुख्य सामग्रीवर वगळा

आटपाडी तालुक्यातील रस्त्यासाठी पाच कोटी- आमदार गोपीचंद पडळकर

आटपाडी ता.19 - महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये आटपाडी तालुक्यातील मुख्य तीन रस्त्यासाठी पाच कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.        महाराष्ट्र शासनाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाली आहे यामध्ये पहिल्याच दिवशी कोट्यावधीच्या पुरवणी मागण्याला अर्थमंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिली आहे. यात आटपाडी तालुक्यातील रस्त्यांसाठी पाच कोटी रुपये निधीला मंजुरी दिली आहे. या रस्त्याच्या कामासाठी निधी देण्याची मागणी आणि पाठपुर्वता विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला होता.  यामध्ये शुकाचार्य ते गोमेवाडी - अर्जुनवाडी ते खरसुंडी या रस्ता दुरुस्तीसाठी  तीन कोटी रुपये निधीला मंजुरी दिली आहे. तसेच नेलकरंजी ते बाळेवाडी, मिटकी ते मुडेवाडी या रस्त्यासाठी एक कोटी रुपये तर राजमार्ग 143 ला जोडणारा रस्ता ते झरे, खरसुंडी, नेलकरंजी या रस्त्यासाठी एक कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याचे श्री. पडळकर यांनी सांगितले.               गेल्या वर्षभरात शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून आटपाडी तालुक्यात अनेक रस्त्यासाठी आणि इतर विकास कामासाठी कोट्यावधीचा निधी आणला आहे. तालुक्यातील रस्त्यांचा बॅकलॉग भरून निघणार आहे. जवळपास तालुक्यातील प्रमुख रस्त्याची कामे पूर्ण होत आली आहे. येणाऱ्या काही दिवसात रस्त्याची कामेच शिल्लक राहणार नाहीत असा विश्वास व्यक्त करून मंजुरी दिलेल्या या कामाचे लवकरच अंदाजपत्रक तयार करून निविदा प्रक्रिया सुरू होईल, असे सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते