मुख्य सामग्रीवर वगळा

करगणीच्या सुपुत्राची फ्रान्समधील पॅरा ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी

आटपाडी ता.१६ - फ्रान्समधील पॅरिस येथे पार पडलेल्या पॅरा ऍथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप (पॅरा ऑलिंपिक) स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना गोळा फेक प्रकारात नवा जागतिक विक्रम नोंदावत करगणीच्या सचिन सर्जेराव खिलारीने सुवर्णपदकाला गवसणी घातली. आगामी पॅरा एशियन स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. त्याच्या या कामगिरीचा करगणीत जल्लोष साजरा केला.
               फ्रान्समधील पॅरिस येथे जागतिक प्यारा ऍथलेटिक्स स्पर्धा पार पडल्या. यामध्ये सचिन खिलारी याने भारताचे प्रतिनिधित्व करताना गोळा फेक स्पर्धेत सहभाग घेतला होता. तो करगणी ता. आटपाडी गावचा युवक असून आटपाडी बाजार समितीचे माजी सभापती तथा कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी सर्जेराव खिलारे यांचा सुपुत्र आहे. तसेच बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. सचिन खिलारी याने पॅरिस येथे नुकत्याच पार पडलेल्या पॅरा ऍथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत 16.2 मीटर गोळा फेक केली. हा त्यांचा नवा जागतिक विक्रम घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतःच्या फेसबुक अकाउंट वरून महेश खिलारे याचे विशेष अभिनंदन केले आहे. त्याच्या कामगिरीची माहिती आटपाडी तालुक्यात समजल्यानंतर करगणी येथे त्याच्या मित्रमंडळींनी आणि गावच्या तरुणांनी एकत्र येऊन फटाक्याची आतषबाजी करून आनंद उत्सव साजरा केला. महेश खिलारी याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण करगणी येथे झाली आहे. उच्च माध्यमिक शिक्षण बारामती येथील महाविद्यालयात घेतले आहे.   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते