मुख्य सामग्रीवर वगळा

टेंभू योजना दोन दिवसात सुरू होणार- आमदार अनिल बाबर

आटपाडी -खानापूर व आटपाडी तालुक्यांतील दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता टेंभू उपसा सिंचन योजना दोन दिवसांत चालू करण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीत घेतल्याची माहिती आमदार अनिल बाबर यांनी दिली आहे.आमदार बाबर म्हणाले, सांगली जिल्ह्यातील खानापूर आणि आटपाडी तालुक्यांमध्ये समाधानकारक पर्जन्यवृष्टी न झाल्यामुळे या तालुक्यात सिंचनासाठी पाण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच सातारा जिल्ह्यातील माण, खटाव या तालुक्यातही पुरेसा पाऊस झालेला नाही. परिणामी शेती पिकांचे विशेषतः ऊस, द्राक्ष आणि डाळिंब पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे तातडीने टेंभू उपसा जलसिंचन योजना सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्याबाबत काल गुरुवारी, सायंकाळी २० जुलै कालवा सल्लागार समितीची बैठक मुंबई येथे पार पडली. यांत पुढच्या दोन दिवसात टेंभू योजनेचे पाणी सोडण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीस आपल्यासह मंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, खासदार संजय पाटील, जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, दीपक चव्हाण, आमदार मकरंद पाटील, आमदार अरुण लाड, आमदार विश्वजीत कदम यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी तसेच महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, सातारा सिंचन मंडळ, सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ आणि जलसंपदा विभागातील संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते