मुख्य सामग्रीवर वगळा

आटपाडीतील गवंड्याची पोर झाली पोलीस उपनिरीक्षक

आटपाडी- घरात अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या आणि  शिक्षणाचा कवडसाही नसलेल्या गवंड्याच्या पोरीने कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय आणि खाजगी शिकवणी शिवाय स्पर्धा परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. तिचे नाव जोशना बाबा खरात आहे. तिचे स्पर्धा परीक्षेतील यश इतर विद्यार्थ्यांना दिशादर्शक आणि मार्गदर्शन करणारे ठरले आहे.      बाबा खरात येथील साठे नगरात आपल्या कुटुंबासोबत पत्र्याच्या दोन खोल्यांमध्ये राहतात. घरात यापूर्वी वडील आणि भाऊ आणि स्वतः त्यांचा शिक्षण अशी कसलाच संबंध नव्हता. ते गवंड्याचे काम करतात. त्या कामातूनच पत्नी दोन मुली आणि दोन मुले अशा कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घरात शेजारी आणि गल्लीत कसलंही शैक्षणिक वातावरण नसलेल्या त्यांच्या मुलीने नुकतीच स्पर्धा परीक्षेत यश मिळवत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. जोशनाचे प्राथमिक शिक्षण तिच्या गल्लीत असलेल्या साठे नगरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झालेल्या तर माध्यमिक शिक्षण आटपाडीतील श्रीमती वत्सलादेवी देसाई गर्ल्स हायस्कूलमध्ये झाले आहे. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने घरातूनच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता. तसं तिला कुणाचंच मार्गदर्शन मिळाले नाही. पुण्या मुंबईसारख्या शहरात जाऊन खाजगी शिकवण्या लावण्यासारखे आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे तिने एक दिवसही खासगी क्लास केला नाही. तिची लहान बहीण आशा हिनेही पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दोघींनी गेल्या काही वर्षापासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास घरात बसूनच सुरू केला होता. काही तज्ञांच्या गाठीभेटी घेऊन मार्गदर्शन घेऊन अभ्यास सुरू ठेवला. आज तिला स्पर्धा परीक्षेत मिळालेले यश साऱ्याच तरुणांना प्रेरणा देणारे आहे. लवकरच तिची लहान बहिण आशा हिला ही स्पर्धा परीक्षेत यश मिळेल असा जोशनाला विश्वास वाटतो. जोशनाच कुटुंब जसं दुर्लक्षित आहे तसंच तिच्या यशाकडेही साऱ्यांचेच दुर्लक्ष झालेले आहेत. ना कुठे पोस्टरबाजी झाली, ना डिजिटल फलक लावले आणि ना सत्कार सोहळे झाले. तिच्या या यशाची दखल घेऊन प्राध्यापक संताजी देशमुख सनी चव्हाण सुनील भिंगे सांगोला अर्बन बँकेचे व्यवस्थापन निर्मल दुग्ध रामदास नाईक नवरे अरविंद तांडवले संतोष कदम नवनाथ कारंडे रामचंद्र माळी सचिन माळी यांनी घरी जाऊन तिचा सत्कार करून तिच्या यशाचे कौतुक केले. यावर जोशना खरात म्हणाली ,'घरची परिस्थिती नाजूक असली तरी माझ्या यशात ती अडथळा ठरली नाही. वडिलांनी रोजंदारी करून आम्हाला शिक्षण दिले. माझ्या या यशात आई-वडिलांचा सर्वात मोठा वाटा आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते