आटपाडी ता.२५- येथील दि. आटपाडी शिक्षण संस्थेच्या श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाचा नुतन प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले यांनी प्राचार्यपदाचा कार्यभार स्वीकारला. रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय ते अर्थशास्त्र विभागाचे प्रोफेसर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निवडीबद्दल महाविद्यालयाने स्वाग सोहळ्याचे आयोजन केले होते. प्रभारी प्राचार्य डाॅ.विजय लोंढे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला. गेली सात वर्षे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणून डाॅ.विजय लोंढे यांनी कार्यभार सांभाळला होता. याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी स्वागत आणि प्रास्ताविक डाॅ.शिवाजीराव विभुते यांनी केले.
यावेळी प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले बोलताना म्हणाले की, आटपाडी शिक्षण संस्थेचे आणि माझे ऋणानुबंध मैत्रीपूर्ण स्वरूपाचे असून मी याच संस्थेचा व महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याचा मला अभिमान आहे. रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात गेली छत्तीस वर्षे प्रामाणिकपणे सेवा केली. श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाचा शिवाजी विद्यापीठात नावलौकिक आहे. प्राचार्य म्हणून महाविद्यालयाचा नवलौकिक वाढवण्यासाठी मी प्रयत्नशील असेन." सूत्रसंचालन प्रा.विजय शिंदे यांनी तर आभार प्रा.संजय हजारे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,प्राध्यापिका, प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा