मुख्य सामग्रीवर वगळा

विद्यार्थ्यांसाठी "त्यांनी" बनवला स्वखर्चातून रस्ता

आटपाडी ता.२१- मासाळवाडी ते माडगूळे हा जुना रस्ता चिलार झाडानी व्यापल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते उद्योजक विनायक मासाळ यांनी स्वखर्चातून रस्ता चिलार मुक्त करून वाहतुकीसाठी खुला करून दिला. त्यांच्या या सामाजिक कार्याचे गावकऱ्यांनी विशेष कौतुक केले.                  मासाळवाडी ते माडगूळे हायस्कूल पर्यंत जुना रस्ता तीन किलोमीटर अंतराचा होता. मासाळवाडीतील विद्यार्थी गदिमा हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी रोज या रस्त्यावरून ये-जा करतात. या रस्त्याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा चिलारझाडी उगवली होती. ही चिलारीची झाडे मोठी झाली होती. चिलार झाडीमुळे संपूर्ण रस्ताच व्यापला होता. या चिलारीतून वाट काढत शालेय विद्यार्थ्यांना रोजची ये-जा करावी लागत होती. गावातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक विनायक मासाळ यांची भेट घेऊन रस्त्याचा प्रश्न मांडला. विनायक मासाळ यांचा राजकीय नेते मंडळी जवळचा संपर्क आहे. त्या माध्यमातून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली मात्र त्यासाठी विलंब लागणार होता. त्यामुळे विनायक मासाळ आणि त्यांचे बंधू राहुल मासाळ यांनी विद्यार्थ्यांची गैरसोय तातडीने थांबवण्यासाठी स्वखर्चातून रस्ता करण्याचा निर्णय घेतला आणि प्रत्यक्षात काम ही सुरू केले. रस्ता चिलारमुक्त करण्याबरोबरच रस्त्यावरील खड्डे मुरमाने बुजवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सर्जेराव मासाळ, माजी सरपंच महादेव मासाळ, बिरा मसाळ, प्रवीण सरगर, सतीश सरगर, बाबुराव पाटील यांच्या उपस्थितीत रस्त्याच्या कामाचा प्रारंभ केला. सध्या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून गावकऱ्यांनी विनायक मासाळ आणि राहुल मासाळ यांचे विशेष आभार मानले. विनायक मासाळ यांनी यापूर्वी कोरोनाच्या काळात मोफत औषध देणे, गावातील ज्येष्ठांना मोफत देवदर्शन घडवणे, गरजू शालेय विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे अशा उपक्रमामध्ये सहभाग घेतला होता.   माडगुळे हायस्कूल ला जाण्यासाठी विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. पालकांनी भेटून ही समस्या मांडली. प्रत्यक्ष मी परिस्थिती पाहिल्यानंतर गांभीर्य ओळखून तातडीने स्वखर्चातून काम सुरू केले. त्याचे समाधान वाटते अशी भावना विनायक मासाळ यांनी व्यक्त केली..                  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते