आटपाडी ता.१८-यंदा पाऊस नसल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकऱ्यांचा मुख्य कणाच असलेल्या लाख मोलाचं जित्राब वाचवण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पंधरा दिवसात चारा डेपो सुरू करावा, अशी मागणी शेटफळे ता. आटपाडी येथील पाणी संघर्ष समिती, ग्रामस्थ आणि ग. दि. माडगूळकर स्मारक समितीने केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने बेमुद ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यंदा पाऊस नसल्यामुळे खरिपाच्या कसल्याही पेरण्या झालेल्या नाहीत. दुसरीकडे गत चार वर्षे चांगला पाऊस झाल्यामुळे आणि टेंभू योजनेचे पाणी आल्यामुळे चारा लागवडीखालील क्षेत्र वाढले होते. स्वतःच्या शेतात चारा उपलब्ध होऊ लागल्यामुळे मोठ्या प्रमाणावर तरुण शेतकऱ्यांनी पशुपालन व्यवसाय सुरू केला आहे. त्यातच डाळिंबाच्या बागा पिन आणि मर रोगाने गेल्यामुळे बहुतांश शेतकरी पशुपालन व्यवसायाकडे वळले आहेत. जनावरांची संख्या वाढलेली असताना पाऊस झाला नसल्यामुळे खरिपाच्या पेरण्या आणि चाऱ्याची लागवड कसलीही झालेली नाही. त्यामुळे सध्या चारा टंचाई निर्माण झाली आहे. चाऱ्याच्या दरात अचानक मोठी वाढ झाली आहे. तसेच सहजासहजी विकत चाराही उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. तेव्हा शासनाने शेतकऱ्यांची लाखमोलाची जनावरे वाचवण्यासाठी तातडीने चारा डेपो सुरू करावा,अशी मागणी शेटफळे ता. आटपाडी येथील पाणी संघर्ष समिती, ग. दि. माडगूळकर स्मारक समिती आणि ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे. तसेच दुष्काळाची तीव्रता वाढत चालल्यामुळे दुष्काळी उपाय योजनेच्या कामाची सुरुवात करून गती द्यावी. मजुरांना मोठ्या प्रमाणावर रोजगार हमीची कामे उपलब्ध करून द्यावीत. तसेच टेंभू योजनेचे पाणी तातडीने सुरू करून तालुक्यातील प्रमुख तलाव, ओढ्यावरील बंधारे भरून द्यावेत अशी, मागणीही केली आहे. यावेळी ग. दि.माडगूळकर स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ. सयाजीराजे मोकाशी, प्रा. सी.पी. गायकवाड, माणगंगा साखर कारखान्याचे संचालक किसनराव गायकवाड, बाजार समितीचे उपसभापती राहुल गायकवाड, बाळासाहेब गायकवाड प्रमुख उपस्थित होते.
करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा