आटपाडी-- साहित्यातून लोकांच्या जगण्या मरण्याचे प्रश्न पुढे येतात. साहित्य आणि साहित्य संमेलने केवळ मनोरंजन नव्हे तर दिशादर्शक आणि प्रबोधनाचे काम करतात मात्र अलीकडे साहित्य संमेलनातील उपस्थिती चिंताजनक झाली असल्याची भावना माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी व्यक्त केली. येथे डॉ. शंकरराव खरात यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त तांबडा मारुती मंदिराच्या सभागृहात साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. डॉ. शंकरराव खरात प्रतिष्ठानने याचे आयोजन केले होते. यावेळी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. डॉ. शंकरराव खरात यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते केले. स्वागत आणि प्रास्ताविक प्रतिष्ठानचे सचिव विलास खरात यांनी केले. यावेळी जेष्ठ साहित्यिक प्रा. कृष्णा इंगवले, साहित्यिक सुभाष कवडे, डॉ. सयाजीराजे मोकाशी, जेष्ठ नेते रावसाहेब पाटील,माजी सरपंच शिवाजीराव पाटील, डॉ. रवींद्र खरात,सचिन खरात आदी उपस्थित होते. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष राजेंद्रअण्णा देशमुख यांनी ग्रामीण भागात अशा पद्धतीने होणाऱ्या साहित्य संमेलनातून नवोदित कवी लेखकांना व्यासपीठ मिळवून देण्याची भूमिका पार पाडली आहे. अशा संमेलनातूनच राज्याला नामवंत कवी लेखक मिळाले आहेत. लेखकांना दूरदृष्टी असते. त्यांच्या साहित्यातून मनोरंजनाबरोबरच प्रबोधन, दुष्काळ, पूर याचे प्रश्न, लोकांच्या व्यथा जगण्याचे प्रश्न आणि संघर्ष आणि समाजाला दिशा दाखवण्याचा मार्ग मांडतात. पूर्वी अशा संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायचा. अलीकडे वाचन संस्कृती कमी होत चालल्याबरोबरच सोशल मीडियाचा प्रभाव वाढत चालल्यामुळे साहित्य संमेलनातील उपस्थिती चिंताजनक बनली आहे. डॉ. शंकरराव खरात यांचे स्मारक सर्वांच्या सहकार्यातून आणि योगदानातून उभारून त्यासाठी जागा देण्याची जबाबदारी माझी असल्याची सांगितले. यावेळी रावसाहेब पाटील, शिवाजीराव पाटील, साहेबराव चवरे, डॉ. रवींद्र खरात सचिन खरात यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर "डॉ.शंकरराव खरात यांचे साहित्य आणि सामाजिक कार्य" यावर आयोजित केलेल्या परिसंवाद पार पडला. यात डॉ. सयाजीराजे मोकाशी, डॉ. कृष्णा इंगवले आणि सुभाष कवडे यांनी सहभाग घेतला होता. कवी संमेलनात सुनील दबडे, पुष्पा मिसाळ,मेघा पाटील, सुभाष कवडे, शिवाजी बंडगर, साहेबराव चवरे आदींनी कवितांचे सादरीकरण केले.
करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा