आटपाडी ता.१२- लेंगरेवाडी ता. आटपाडी येथील न्यू. इंग्लिश स्कूलच्या मैदानावर मुंबई येथील "आई" प्रतिष्ठान आणि शिवशक्ती इंजिनिअरिंग कंपनीने संयुक्तपणे वड, पिंपळ आणि चिंच या प्रकारच्या शंभर झाडाचे वृक्षारोपण केले. यावेळी "आई" प्रतिष्ठानचे शरद कोरडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. शरद कोरडे हे "आई" प्रतिष्ठान आणि शिवशक्ती इंजिनिअरिंग कंपनीच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवतात. कोरोनाच्या काळात शेटफळे ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या मिनी कोविड सेंटरला मोफत औषध साठा पुरवला होता. गतवर्षी धावडवाडीत रस्त्याच्या दुतर्फा 1000 लहान वृक्षाचे रोपन केले होते. यंदा पावसाळ्याच्या तोंडावर त्यांनी वृक्षारोपणाचा उपक्रम सुरू केला आहे. त्याची सुरुवात लेंगरेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूल या माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर वृक्षारोपण करून केली. यामध्ये त्यांनी पाच ते सात फूट उंचीचे पिंपळ, वड, चिंच आणि बेलाच्या झाडाचे वृक्षारोपण केले. जेसीबीच्या साह्याने वृक्षारोपणासाठी खड्डे खुदाई करून त्यामध्ये शेणखत आणि वर खते टाकून ही झाडे लावली आहेत. त्यासाठी ठिबक सिंचनाची ही सोय करून दिली आहे. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आर. डी. मोहिते, शेटफळेचे माजी उपसरपंच निवृत्ती गायकवाड, सहशिक्षक डी. एम. भिवरे, एस. डी.घेरडे, बी. डी. बागल, के. एम. सावंत, विक्रांत गायकवाड, वासुदेव लेंगरे, कुंडलिक लेंगरे आदी उपस्थित होते.
करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा