आटपाडी--पांढरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला सतत मागणी करूनही रिक्त असलेल्या जागी शिक्षक दिला जात नसल्यामुळे आणि मॉडेल स्कूल अंतर्गत मंजूर झालेल्या नवीन खोल्याचे बांधकाम सुरू केले जात नसल्यामुळे संतप्त पालकांनी आज शाळेला टाळे ठोकले. यामुळे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. अधिका-यांनी दोन दिवसात शिक्षक देण्याचे आश्वासन दिल्यानंतर दुपारनंतर शाळा सुरू झाली. याबाबत अधिक माहिती अशी की, आटपाडी अंतर्गत पांढरेवाडीची वस्ती येते. तिथे जिल्हा परिषदेची पहिली ते सातवीपर्यंतची शाळा आहे. यामध्ये 90 विद्यार्थी आहेत. त्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांच्या पाच जागा आहेत. पैकी दोन जागा गेली तीन वर्षे रिक्त आहे तर एका जागेवर मुख्याध्यापक असून त्यांच्याकडे केंद्रप्रमुख पदाचा अतिरिक्त भार आहे. त्यांच्याकडे केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक पदाची जबाबदारी असल्यामुळे त्यांना ज्ञानदानासाठी वेळ मिळत नाही. सहाजिकच दोन शिक्षकांवरच पाच वर्गाची जबाबदारी आहे. एका शिक्षकाला दोन वर्ग एकाच खोलीत एकत्र करून शिकवावे लागत आहे. रिक्त जागेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची पालकांनी यापूर्वी अनेक तक्रारी केल्या आहेत. या तक्रारीची दखल घेतली जात नव्हती. तसेच या शाळेसाठी नवीन खोल्या मंजूर झाल्या असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन बरेच दिवस झाले पण काम सुरू केले जात नाही. जुन्या खोल्यांचे नेर्लेखन करून पाडल्या आहेत. मात्र नवीन खोल्याचे बांधकाम सुरू केलेले नाही. स्थानिक एका ग्रामस्थांनी बांधकाम विभागाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीचा तात्काळ निपटारा करून शाळेचे बांधकाम सुरू करावे, अशी शालेय व्यवस्थापन समिती आणि पालकांची मागणी होती. त्याची दखल घेतली जात नसल्याने संतप्त झालेल्या पालकांनी शाळेवर थेट मोर्चा काढला. त्यांनी शाळेची कुलपे काढून दिली नाहीत. गट शिक्षण अधिकारी दत्तात्रय मोरे यांनी भेट देऊन पालकांशी चर्चा केली आणि दोन दिवसात शिक्षक देण्याचे आश्वासन दिल्यानंतर दुपारनंतर शाळा सुरू झाली.
करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा