आटपाडी ता. 19 -- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेतून गत दोन वर्षात तालुक्यातील विविध अपघातात मरण पावलेल्या वीस शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रती कुटुंब दोन लाख रुपये प्रमाणे चाळीस लाख रुपये विमा रक्कम मिळाली आहे. याने घरच्या कर्त्या पुरुषाचा अपघातात मृत्यू झालेल्या निराधार कुटुंबाला मोठा हातभार लावला आहे. तर नव्याने सुरू केलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदानाचे सात प्रस्ताव अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. लवकरच त्यांनाही अनुदान मिळणार आहे. 2019 मध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांचा विविध प्रकारच्या अपघातात मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाईच्या माध्यमातून आर्थिक आधार देण्याच्या दृष्टिकोनातून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत वय 10 ते 75 मधील शेतकरी योजनेला पात्र होतो. यामध्ये मोटरसायकल, बस आणि रेल्वे अपघात, सर्पदंशाने मृत्यू, पाण्यात बुडून मृत्यू, विजेचा शॉक, रस्ते अपघात, उंचावरून पडून मृत्यू झाल्यास विमा भरपाईला शेतकरी पात्र होतो. नव्याने यात प्रस्तुतीत महिलेचा मृत्यू झाल्यास योजनेच्या लाभास पात्र ठरवण्याचा निकषात समावेश केला आहे. याशिवाय अपघातात दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख आणि एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये भरपाई मिळते. त्यासाठी शेतकरी च्या नावावर सातबारा आणि आठ उतारा असावा किंवा शेत जमीन नावावर नसली तरी त्या कुटुंबातील एकाच्या नावावर शेत जमीन असल्यास शेतकरी भरपाईला पात्र होतो. याची कारवाई कृषी विभागातून केली जाते. अपघातानंतर एक महिन्याच्या आत मध्ये साधा अर्ज कृषी विभागाकडे कारवयाचा आहे. गत दोन वर्षात आटपाडी तालुक्यातून शेतकरी अपघात विमा योजनेसाठी 30 प्रस्ताव दाखल केले होते. यासाठी आटपाडी कृषी विभागात स्वतंत्र टेबलच ठेवला आहे. त्यासाठी एक कर्मचारी पूर्ण वेळ नेमला आहे. त्यामुळे आलेल्या अर्जाची गतीने पूर्तता करून जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे पाठवला जातो. यामध्ये पोस्टमार्टम रिपोर्ट, पोलीस ठाण्यातील अपघाताची नोंद, सातबारा, आठ "अ" अशा विविध कागदपत्राची आवश्यकता असते. गेल्या दोन वर्षात कृषी विभागाकडे 30 प्रस्ताव आले होते. त्यापैकी 20 प्रस्ताव मंजूर होऊन कुटुंबियांना दोन लाख रुपये प्रमाणे 40 लाख रुपये विमा रक्कम मिळाली आहे. ही रक्कम या शेतकऱ्यांच्या वारसांच्या खात्यावर जमा केलेली आहे. उर्वरित सात प्रस्ताव परिपूर्ण करून शासनाकडे पाठवलेत तर तीन प्रस्ताव अपूर्ण आहेत. या योजनेमुळे शेतकऱ्याचा अपघातात मृत्यू झाल्याने बेवारस झालेल्या कुटुंबीयांना मोठा आर्थिक हातभार लागत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. चौकट- योजनेत बदल विमा ऐवजी सानुग्रह अनुदान योजना सुरू. विमा कंपन्याकडून विमा भरपाई मंजूर करण्यास टाळाटाळ केली जात होती. अनेक प्रस्ताव नामंजूर केले जात होते. ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर यामध्ये बदल करून "गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान" ही नव्याने योजना नुकतीच सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याच्या कामाला गती मिळणार आहे. स्थानिक समितीकडे अनुदान देण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. यासाठी तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, आरोग्य अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचा समावेश असलेली समिती नेमली आहे. ही समिती दर महिन्याला बैठक घेऊन सानुग्रह अनुदान मंजुरी देण्याचे काम करणार आहे.
करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा