मुख्य सामग्रीवर वगळा

आटपाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ठरले,,,

             आटपाडी ता.३- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हिच आमची खरी राष्ट्रवादी काँग्रेस असून त्यांच्या सोबत राहण्याचा निर्णय आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केला.                                                         येथील शासकीय विश्रामगृहावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष अनिता पाटील, ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष सुरज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव सादीक खाटीक,  ज्येष्ठ नेते विष्णुपंत चव्हाण, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष अश्विनी कासार यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सध्याच्या राजकीय घडामोडीवर नाराजी व्यक्त करून भाजपचे राजकीय पीछेहाट सुरू झाल्याने आणि जनमानसातील प्रतिमा खराब होत चालल्याने भाजप आणि सीबीआय आणि ईडी सारख्या संस्थांचा वापर करून अत्यंत खालच्या दर्जाचे फोडाफोडीचे सुरू केलेल्या राजकारण निषेध नोंदवला. या बैठकीत पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हिच आमची राष्ट्रवादी काँग्रेस असल्याची भावना हणमंतराव देशमुख, रावसाहेब पाटील, अनिता पाटील, सादिक खाटीक आदी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी प्रभाकर नांगरे-पाटील, विलासराव शिंदे, शशिकांत भोसले, दत्ता यमगर, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष जालिंदर कटरे, वक्ता सेलचे तालुकाध्यक्ष प्रा. संताजी देशमुख, पदवीधर सेलचे तालुकाध्यक्ष मनोज भोसले, कामाचे माजी सरपंच परशुराम सरक, विजय पुजारी, अतुल जावीर, ऋषिकेश गुरव, शरद सोननुर, धुळा ठेंगले आदी प्रमुख उपस्थित होते.                      

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते