मुख्य सामग्रीवर वगळा

खानापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला फुटीचे गृहण?


    राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळे राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. त्यामुळे राजकीयदृष्टया संवेदनशील असणाऱ्या खानापूर विधानसभा मतदारसंघात देखील राजकीय भूकंप घडण्याचे संकेत मिळत आहेत. माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील यांचे सुपुत्र माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांनी शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र कार्यकर्त्यांनी सतेत येण्यासाठी अजितदादा पवार यांची कास धरू, असा तगादा लावल्यामुळे भूमिका बदलण्यावरून उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
        माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील यांनी कदम गटाच्या मतदारसंघातील राजकीय हस्तक्षेपाला कंटाळून सन 2020 मध्ये काँग्रेसला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी ताकद देण्याऐवजी पाटील गटाकडे डोळेझाक केली आहे. मागच्या चार वर्षांत राष्ट्रवादीत असून देखील अजितदादा पवार यांचा अपवाद वगळता विकासकामांसाठी कोणाकडूनही अपेक्षित मदत झालेली नाही. तर दुसरीकडे माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील, माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांनी अनेकवेळा नेत्यांसमोर जाहीररीत्या परखड आणि सडेतोड भूमिका मांडत राष्ट्रवादीचा आमदार करण्यासाठी आटपाडी आणि विसापूर सर्कलमध्ये पक्ष बळकट करून समन्वय साधण्याची वारंवार मागणी केली होती. मात्र तरीही राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेतेमंडळी आणि जिल्हा नेतृत्वाकडून डोळेझाक होत असल्याने पाटील गटाची राजकीय कोंडी होत आहे. 
        तरीही माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील यांनी शरद पवारसाहेब यांच्यासोबत राहण्याची भूमिका जाहीर केली आहे.  मात्र खानापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी पक्षाअंतर्गत गटबाजीची व्यथा मांडूनही वरिष्ठ नेतेमंडळीकडून होत असलेली डोळेझाक आणि जिल्हा नेतृत्वाकडून न मिळणारे राजकीय पाठबळ हा कळीचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. अशा राजकारणातील बिकट परिस्थितीत राजकीय स्थैर्य टिकून रहावे आणि विटा शहरातील विकासकामांसाठी भरीव निधी मिळावा, यासाठी आणि आगामी राजकीय मोर्चेबांधणीच्या दृष्टीने बदलत्या राजकीय वाऱ्याचा अंदाज घेत पाटील गटाचे कार्यकर्ते सत्तेत येण्यासाठी अजितदादा पवार यांची कास धरू, असा तगादा लावत आहेत. त्यामुळे भूमिका बदलण्यावरून
खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय पटलावर उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील आणि माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव पाटील नेमकी काय भूमिका घेणार याचीच उत्सुकता निर्माण झाली आहे.     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते