मुख्य सामग्रीवर वगळा

खानापूर मतदारसंघात अजित पवाराच्या गळाला "'बडा मासा'

  राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत हात मिळवणी करून सत्तेत सहभाग घेतल्याचे राजकीय पडसाद खानापूर विधानसभा मतदारसंघापर्यंत उमटले आहेत. मतदारसंघातून घाटमाथ्यावरील मातब्बर युवा नेत्यांने अजित पवार यांची भेट घेतली आहे. राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या चार दिवसात समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन अजित पवाराच्या गटात प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.                                                                         राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड करून भाजपसोबत हात मिळवणी करून सत्तेत सहभागी झाले आहेत. त्याचे पडसाद राज्यात उमटले आहेत. तुलनेत सांगली जिल्ह्यात या राजकीय घटनेचा फारसा परिणाम जाणवला नव्हता. मात्र दोन दिवसापासून खानापूर विधानसभा मतदारसंघात लोकांच्या उलट सुलट रंगतदार चर्चा रंगली आहे. खानापूर विधानसभा मतदारसंघातील काही युवा नेतृत्वानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन उपमुख्यमंत्री पदावर निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. यात घाटमाथ्यावरील युवा नेत्यांची अजित पवार यांच्याशी एक तास बैठक झाल्याची चर्चा आहे. सदरच्या बैठकीत अजित पवाराच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या मुद्द्यावरच सखोल चर्चा झाली आहे. या बैठकीची वार्ता खानापूर मतदारसंघात प्रत्येक गावागावा पर्यंत पोहोचली असून त्यावर चर्चा सुरू झाल्या आहेत. येणाऱ्या चार दिवसात कार्यकर्त्यांचा जंगी मेळावा घेऊन त्यांची मते जाणून घेऊन राजकीय वाटचालीचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जाते. सध्या तरी युवा नेतृत्व पहिल्या टप्प्यात अजित पवारासोबत जाणार असल्याचे बोलले जाते. त्यानंतर ज्येष्ठ नेते आपली भूमिका घेणार आहेत. या साऱ्या राजकीय घडामोडीकडे मतदार संघाचे लक्ष लागले आहे.  हे युवा नेतृत्व कोण याची लोकांना उत्सुकता लागली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते