आटपाडी ता.२०- आटपाडी तलावात विदयुत पंप पाण्यात सोडण्यासाठी गेलेल्या दोघांचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. ही घटना आज गुरूवारी दुपारी तीन वाजता आटपाडी तलावावर घडली. अनिकेत अमृत विभूते वय.२७ रा. माडगुळे आणि विलास मारूती गुळदगड वय.४७. रा. शेवते ता. पंढरपूर असे मयताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, माडगुळे येथील अमृत विभूते यांच्या माडगुळे येथील शेतीला आटपाडी तलावातून पाइपलाइन करून पाणी नेहले आहे. तलावात पाणी कमी झाल्यासमुळे विदयुत पंप उघडा होत होता. त्यामुळे खोल पाण्यात पंप सोडण्यासाठी म्हणून अनिकेत आटपाडी तलावावर गेला होता. दरम्यान, शेवती ता. पंढरपूर येथील दोन नातेवाईक आले होते. आटपाडी तलावावर जाताना या दोन पाहुण्यांना अनिकेत सोबत घेऊन गेला होता. एकजण तलावावर पाण्याच्या बाहेर थांबला होता तर अनिकेत आणी विलास विद्युत मोटार पाण्यात आतमध्ये सोडण्यासाठी गेले होते. पाण्यात असलेल्या विद्युत पंपाजवळ पोहोचल्यावर दोघांनाही पाण्यातून विजेचा जोरदार धक्का बसला. दोघेही ओरडले आणि पाण्यात पडले. या घटनेने तलावा बाहेर उभा असलेला नातेवाईक भयभीत झाला आणि त्याने पळत रस्त्याकडे धाव घेतली. दरम्यान, वनीकरण कार्यालयाकडून तडवळेचे सरपंच जितेंद्र गीडडे आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती दादासाहेब मरगळे हे मोटरसायकलीवरून गावाकडे निघाले होते. नातेवाईकांने या दोघांच्याही मोटरसायकली अडवून त्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यानी तात्काळ वीज कार्यालयाला माहिती देऊन विद्युत पुरवठा खंडित करण्याची सूचना दिली. तसेच आटपाडी पोलीस ठाण्याला याची माहिती कळवली. विद्युत पुरवठा खंडित केल्यानंतर जमलेल्या लोकांनी दोघांनाही पाण्यातून बाहेर काढले आणि उपचारासाठी आटपाडी ग्रामीण रुग्णालयात नेले मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची बातमी आटपाडी आणि माडगूळेत पोचल्यामुळे दोन्ही गावातील ग्रामस्थांनी तलावावर मोठी गर्दी केली होती. या घटनेची आटपाडी पोलीस ठाण्यात नोंद केली आहे.
करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा