आटपाडी (प्रतिनिधी):
सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळेवाडी (ता. आटपाडी) गावाच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. बाळेवाडीतील माजी महिला व बालकल्याण सभापती, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच आणि विविध सोसायट्यांच्या अध्यक्षांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेचा 'भगवा' हाती घेतला आहे. या जंगी पक्षप्रवेशामुळे बाळेवाडी गाव पूर्णपणे ‘भगवामय’ झाले असून निवडणुकीत शिवसेनेला गावातून ‘वनवे’ मतदान होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
जनसंवाद मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी हा राजकीय धडाका पाहायला मिळाला. यावेळी निंबवडे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ. विद्याताई मोटे आणि निंबवडे पंचायत समिती गणाचे उमेदवार सचिन मोटे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश पार पडला. *यांनी केला शिवसेनेत प्रवेश*:
जिल्हा परिषदेच्या माजी महिला बालकल्याण व समाजकल्याण सभापती सौ. संगिता गणपतराव खरात, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बायनाबाई श्रीमंत खताळ, विद्यमान सदस्य कासाबाई भिमराव भुते, माजी चेअरमन रामचंद्र कारंडे, माजी चेअरमन गजानन कोळेकर, माजी उपसरपंच बापू कोळेकर, लक्ष्मण कोळेकर, काका कोळेकर, माजी उपसरपंच संतोष कोळेकर, माजी उपसरपंच शंकर कोळेकर, दादा खताळ, माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष पुकळे, दत्तात्रय पुकळे, आप्पासाहेब खताळ, नामदेव ढेरे, राहुल खरात यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला. *प्रमुख उपस्थिती:*
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, माजी सरपंच जगन्नाथ कोळेकर, माजी सरपंच आबासाहेब भुते, माजी सरपंच गणपतराव खरात, पोलीस पाटील श्रीमंत खताळ, युवा उद्योजक आशिष (दादाशेठ) कचरे, माजी उपसरपंच तानाजी कोळेकर, मधुकर खरात, आप्पा (शेठ) कोळेकर, माजी सदस्य शिवाजी कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
*गावात शिवसेनेची पकड मजबूत*:
एकाच वेळी गावातील प्रभावी नेत्यांनी आणि आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. बाळेवाडी गावावर आता शिवसेनेची मजबूत पकड निर्माण झाली असून, सौ. विद्याताई मोटे आणि सचिन मोटे यांना या गावातून विक्रमी मताधिक्य मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या पक्षप्रवेशामुळे निंबवडे गटातील शिवसेनेची ताकद अनेक पटींनी वाढली असल्याचे बोलले जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा