मुख्य सामग्रीवर वगळा

निंबवडे गट दहशतमुक्त आणि स्वाभिमानी समाज निर्मातीसाठी सेनेला साथ द्या - अँड. विद्या मोटे

आटपाडी -लोकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासोबतच निंबवडे गट दहशतमुक्त आणि स्वाभिमानी समाज निर्मातीसाठी शिवसेनेला सोबत साथ द्यावी, असे आवाहन अँड. विद्या मोटे यांनी केले. त्यांनी बनपुरी, बाळेवाडी आदी गावांचा दौरा केला. त्याच्या सोबत माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील आदी होते. शिक्षण, रोजगार, आरोग्याचया प्रश्नांसाठी निंबवडे जिल्हा परिषद गटाची प्रतिनिधी म्हणुन मी प्रामाणिक योगदान देणार आहे. माझ्या शिक्षणाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी व्हावा, अशी माझी भुमिका आहे. निंबवडे गटातील सर्व जनता परिवर्तनासाठी शिवसेनेसोबत आहे, असा विश्वास निंबवडे जिल्हा परिषद गटातील शिवसेना उमेदवार विद्याताई मोटे यांनी व्यक्त केला.
 मतदारांना स्वाभिमानी समाज निर्मीतीसाठी शिवसेनेला विजयी करण्याचे आवाहन केले.
साध्य फौडेशनच्या माध्यमातुन अनेकांना मदतीचा हात देत आम्ही शिक्षण, नोकरीची दारे खुली केली आहेत. वृक्षारोपण चळवळ, वैद्यकीय मदत, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
केंद्राव्दारे आम्ही लोकहिताचा नवा अध्याय निर्माण केला.
समाजाला दहशतमुक्त करने, त्यांच्या प्रश्नांची सोडवणुक करणार.
माझ्या लोकांना होणारा त्रास करण्यासाठी मी निवडणुक लढवत आहे.
निंबवडे गटातील जनतेला इतिहास निर्माण करण्याची एक संधी जिल्हा परिषद निवडणुकीत प्राप्त झाली आहे. जनतेच्या विश्वासाला मी तडा जावु देणार नाही, काळ कसोटीचा असलातरी विचारपुर्वक जनतेने साथ द्यावी. शिवसेनेच्या माध्यमातुन विकासाच्या संकल्पना पुर्णत्वास नेल्या जातील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते