मुख्य सामग्रीवर वगळा

विद्या मोटे यांच्यासाठी लाडक्या बहिणींची वज्रमूठ; तरुणाईच्या सहभागामुळे परिवर्तनाचे वारे

आटपाडी ता. 1- संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या निंबवडे जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले असून, शिवसेनेच्या उमेदवार विद्या मोटे यांच्या पाठीशी महिला, सुशिक्षित मतदार आणि युवक मोठ्या ताकतीने उभे राहिल्याचे चित्र आहे. या गटातील प्रचाराची धुरा खुद्द महिला आणि तरुणांनीच आपल्या खांद्यावर घेतल्याने यंदा निंबवडे गटात ऐतिहासिक परिवर्तन अटळ मानले जात आहे.
विद्या मोटे यांनी गेल्या चार वर्षांपासून निंबवडे गटात विविध सामाजिक उपक्रम आणि जनजागृतीच्या माध्यमातून मोठी चळवळ उभी केली आहे. त्यांच्या या कार्याचा प्रभाव तरुणांवर आणि महिलांवर मोठ्या प्रमाणावर पडला असून, त्याचाच सकारात्मक परिणाम या निवडणुकीत दिसून येत आहे. गटातील दिशा भरकटलेल्या तरुणांना प्रबोधनातून योग्य वाट दाखवण्याचे काम मोटे यांनी केले, ज्यामुळे आज सुशिक्षित युवक त्यांच्या प्रचारात अग्रभागी आहेत*लाडक्या बहिणींचा उत्स्फूर्त सहभाग*
या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, सांगली जिल्ह्यात सर्वाधिक महिलांची गर्दी विद्या मोटे यांच्या प्रचारात पाहायला मिळत आहे. विशेषतः सर्वसामान्य कुटुंबातील महिला आणि मेंढपाळ समाजातील महिलांनी विद्या मोटे यांना आपली हक्काची 'लाडकी बहीण' मानून परिवर्तनाची चळवळ हाती घेतली आहे. 'आमची बहीण, आमचा उमेदवार' अशी भूमिका घेत या महिला घराघरांत जाऊन मोटे यांच्या विधायक कार्याचा प्रचार करत आहेत.
तरुणांच्या हातात निवडणुकीची सूत्रे
केवळ घोषणाबाजी न करता, विधायक भूमिकेतून समाजकारण करणाऱ्या विद्या मोटे यांच्यासाठी युवक वर्ग स्वतःहून मैदानात उतरला आहे. निंबवडे गटातील मतदारांचा कल पाहता, सर्वसामान्य जनतेनेच ही निवडणूक आता हातात घेतली आहे. सुशिक्षित मतदार आणि जागृत महिला शक्तीच्या जोरावर विद्या मोटे मुसंडी मारणार, अशी चर्चा आता संपूर्ण आटपाडी तालुक्यात रंगू लागली आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते