मुख्य सामग्रीवर वगळा

खरसुंडती भाजपाची प्रचारात जोरदार मुसंडी

आटपाडी - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीत खरसुंडी गटात खरसुंडीसह नेलकरंजी, चिचाळे, कानकात्रेवाडी आणि गोमेवाडी गावांनी आज राजकीय भूमिका स्पष्ट करत ‘कमळ’लाच मत देण्याचा अंतिम निर्णय जाहीर केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराने या गावांमध्ये अक्षरशः राजकीय वादळ निर्माण केले असून, विरोधकांच्या गोटात खळबळ उडाली आहे.
खरसुंडी जिल्हा परिषद गटाचे भाजपचे अधिकृत उमेदवार चंद्रकांतभाऊ भोसले आणि खरसुंडी पंचायत समिती गणातील उमेदवार सौ. लता पुजारी व नेरकंजी गणाच्या उमेदवार पौर्णिमा महारगुडे यांच्या प्रचारासाठी चिंचाळे खरसुंडी आवटेवाडी धावडेवाडी नेलकरंजी गोमेवाडी आधी गावात उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी आणि बैठकी घेतल्या. महिला, युवक, शेतकरी व ज्येष्ठ नागरिकांचा लोंढा उसळला. विशेष म्हणजे, यावेळी प्रचाराची सूत्रे महिलांनीच हाती घेतली असून, महिलांचा अभूतपूर्व सहभाग हा या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट ठरत आहे.
प्रचारादरम्यान ग्रामस्थांनी थेट शब्दांत सांगितले की, रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य, शिक्षण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न या सर्व बाबींमध्ये भाजपच्या उमेदवारांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. फक्त भाषणे देणाऱ्यांना नाकारून, प्रत्यक्ष काम करणाऱ्या नेतृत्वालाच मत देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे यावेळी कोणतीही तडजोड न करता ‘कमळ’ चिन्हासमोरील बटण दाबून भाजपला प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचा निर्धार जाहीरपणे व्यक्त करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते