आटपाडी ता.१- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल खरसुंडी येथे शिवसेनेने शोकसभेचे आयोजन केले होते. यावेळी अनेक मान्यवरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यपद्धतीला उजाळा देऊन श्रद्धांजली अर्पण केली. खरसुंडी येथे शिवसेनेच्या कार्यालयात हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जयदीप भोसले यांच्या हस्ते अजित पवार यांच्या प्रतिमेस अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी डॉ. मनीषा पुजारी, डॉ. उमेश पुजारी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत देठे प्रमुख उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवर आणि केलेल्या कामावर प्रकाश टाकून मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. यावेळी विनोद पुजारी, जहांगीर शेख,दुर्वाआप्पा देठे, ओटीवाडी विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष बापुराव खाडे,मा जी उपसरपंच मच्छिंद्र भोसले, सुमंत पुजारी,शरद पेडकर, ग्रामपंचायत सदस्य सुभाष माळी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फोटो -१) खरसुंडी ता. आटपाडी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिवसेनेकडून श्रद्धांजली अर्पण केली.
करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा