मुख्य सामग्रीवर वगळा

जयदीप भोसले यांचा तळेवाडीतून प्रचाराचा झंजावत

आटपाडी ता. 28- खरसुंडी जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे उमेदवार जयदीप भोसले यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ तळेवाडी येथील श्री. सिद्धनाथ आणि विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन उत्साहात केला. यावेळी जिल्हा परिषदेचे उमेदवार जयदीप भोसले आणि पंचायत समितीच्या उमेदवार सौ. सुनीता सरगर प्रामुख्याने उपस्थित होत्या.
विकासाच्या मुद्द्यावर मतदारांचा कौल
मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर खरसुंडी गटात आता तळेवाडी, काळेवाडी आणि गोमेवाडी या गावांचा नव्याने समावेश झाला आहे. या नवीन गावांमध्ये जयदीप भोसले यांचे ग्रामस्थांनी जंगी स्वागत केले. शिवसेनेच्या माध्यमातून या भागात झालेली विकासकामे आणि स्वर्गीय मोहनराव पाटील (काका) यांचे या परिसराशी असलेले जुने जिव्हाळ्याचे नाते आठवत ग्रामस्थांनी दोन्ही उमेदवारांना आपला पूर्ण पाठिंबा दर्शवलाउर्वरित कामांसाठी शिवसेनेला साथ द्या: तानाजी पाटील
काळेवाडी येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, "या परिसराच्या विकासासाठी शिवसेनेने नेहमीच पुढाकार घेतला आहे. राहिलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी आणि विकासाची ही गंगा अखंड चालू ठेवण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा."
या प्रचार शुभारंभ प्रसंगी तळेवाडी, काळेवाडी आणि गोमेवाडी परिसरातील ज्येष्ठ नागरिक, तरुण कार्यकर्ते आणि विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतदारसंघातील या पहिल्याच टप्प्यातील प्रतिसाद पाहता शिवसेनेच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते