मुख्य सामग्रीवर वगळा

जयदीप भोसले यांच्या प्रचारासाठी नारीशक्ती एकवटली

खरसुंडी ( प्रतिनिधी)- खरसुंडी जिल्हा परिषद गटातील राजकीय वातावरण तापत चालले असून, शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार जयदीप भोसले आणि खरसुंडी गणातील उमेदवार डॉ. मीनाक्षी पुजारी यांच्या प्रचारासाठी आता महिला शक्ती एकवटली आहे. गावभेटी आणि पदयात्रांच्या मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या आहेत.  
जयदीप भोसले यांच्या समर्थनार्थ महिला कार्यकर्त्यांनी तनपुरवाडी, घुलेवाडी आणि कानकात्रेवाडी या गावांत जोरदार प्रचार फेरी काढली. या फेरीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. फेरीनंतर महिलांनी घरोघरी जाऊन इतर महिला मतदारांशी संवाद साधला.
संवाद साधताना महिला कार्यकर्त्यांनी स्वर्गीय मोहनराव (काका) बाबर, माजी आमदार स्वर्गीय अनिलभाऊ बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली कामे, तसेच विद्यमान आमदार सुहास बाबर आणि सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या माध्यमातून मतदारसंघात झालेल्या विकासकामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवली. "विकासाची ही परंपरा सुरू ठेवण्यासाठी शिवसेनाच हवी," अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
जयदीप भोसले यांना गावागावातून आणि विशेषतः महिला मतदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतल्याने विरोधकांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. नागरिकांनीही यावेळेस विकासाच्या मुद्द्यावर ठाम राहून शिवसेनेला साथ देण्याची ग्वाही दिली आहे.महिलांच्या या सक्रिय सहभागामुळे खरसुंडी गटात जयदीप भोसले यांचे पारडे जड होताना दिसत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते