मुख्य सामग्रीवर वगळा

नेलकरंजी--शिवसेनेचे जयदीप भोसले यांनी मतदारांशी साधला संवाद

आटपाडी (प्रतिनिधी):खरसुंडी जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे उमेदवार जयदीप भोसले यांनी निवडणूक प्रचारार्थ मिटकी गावाच्या नागरिकांशी संवाद साधला. या दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले असून, आगामी काळात त्यांच्या पाठीशी ठाम राहण्याची ग्वाही दिली आहे.
*बाळूमामांचे दर्शन घेऊन प्रचाराचा श्रीगणेशा*
जयदीप भोसले यांनी दौऱ्याची सुरुवात मिटकी येथील संत बाळूमामा मंदिरात दर्शन घेऊन केली. देवदर्शनानंतर त्यांनी गावातील प्रमुख चौक आणि वस्त्यांवर जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या.    *मोहनकाकांच्या विकासकामांना उजाळा*
यावेळी झालेल्या कोपरा सभा आणि संवादादरम्यान ग्रामस्थांनी माजी आमदार स्वर्गीय मोहनराव पाटील (मोहनकाका) यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांच्या आठवणींना उजाळा दिला. "काकांच्या काळात झालेली कामे आजही आमच्या स्मरणात आहेत आणि त्याच विकासाची परंपरा पुढे नेण्यासाठी आम्ही जयदीप भोसले यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू," असा विश्वास ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला.
या संवाद दौऱ्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कटरे, सचिन गुरव, डॉ. उमेश पुजारी, माजी सरपंच दादासाहेब कोळेकर, सोसायटी संचालक ब्रह्मदेव जरग, आवटेवाडीचे सरपंच किरण पवार, ब्रह्मदेव कोळपे, आबासो यमगर, दादा कोकरे, आत्माराम माने, यशवंत कोळपे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दौऱ्यामुळे मिटकी परिसरात जयदीप भोसले यांच्या प्रचाराला मोठी गती मिळाली असल्याचे दिसून येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते