मुख्य सामग्रीवर वगळा

करगणीत राजकीय भूकंप, विरोधी तीन सदस्यानंतर आता उपसरपंचाच्या भावाचा शिवसेनेला पाठिंबा

करगणी -करगणीत भाजपाला रोज धाक्यावर धक्के बसत आहेत. अनेकांनी भाजपाची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपाच्या तब्बल तीन ग्रामपंचायत सदस्य नंतर आता विद्यमान उपसरपंच साहेबाराव खिलारी यांचे  बंधू प्रसिद्ध गलाई व्यावसायिक अंकुश खिलारी यांनी महायुतीचे उमेदवार विनायकराव मासाळ आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार दत्तात्रय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पाठिंबा जाहीर केला. यापूर्वी अभिजित जाधव,रूपाली कांबळे, उत्तम माने, या ग्रामपंचायत सदस्यांनी सेनेचा भगवा खांद्यावर घेतला होता.
बड्या नेत्यांचे पक्षांतर आणि पाठिंबा:
साहेबाराव खिलारी आणि  त्यांचे बंधू अंकुश खिल्लारी हे करगणी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच असून त्यांचा गावात मोठा जनसंपर्क आहे.  त्यांच्यासोबतच गलाई व्यवसायातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व अंकुश खिलारी यांनीही शिवसेनेची धुरा हाती घेण्याचा निर्णय घेतल्याने महायुतीच्या ताकदीत मोठी वाढ झाली आहे. विनायकराव मासाळ आणि दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश सोहळा संपन्न झाला.विजयाचा निर्धार:
यावेळी बोलताना अंकुश खिलारी म्हणाले की, भागाच्या विकासासाठी आणि विनायकराव मासाळ यांच्या दूरदृष्टीवर विश्वास ठेवून आम्ही हा निर्णय घेतला आहे. शिवसेना आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
राजकीय वर्तुळात खळबळ:
निवडणुकीच्या तोंडावर भाजपाच्या बालेकिल्ल्यात लागलेल्या या सुरुंगामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. करगणी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात शिवसेनेची पकड आता अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसत असून, या घडामोडीमुळे संपूर्ण मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते