आटपाडी ---माणगंगा साखर कारखाना नूतन संचालक मंडळाने बँकेकडून 'लिव इन लायसन' मधून पाच वर्षे चालवण्यासाठी करारावर ताब्यात घेतला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. कारखाना सुरू करण शेतकरी आणि कामगाराच्या हिताच्या आहे मात्र विरोधकाकडून तक्रारी करून विघ्न आणण्याचा प्रयत्न चालू आहे. आम्ही बँकेकडून आणलेला कारखाना त्यांनी अजूनही सहकारी तत्त्वावर चलवावा मात्र घाणेरडे उद्योग बंद करावेत अन्यथा खाजगी केलेली सूतगिरण पुन्हा बँकेच्या ताब्यात घेण्यासह कारखान्यातील उद्योग उघड्यावर आणण्याची वेळ आमच्यावर आणून देऊ नका, असा इशारा आणि आवाहन केले. जिल्हा बँकेच्या ताब्यातून माणगंगा साखर कारखाना नूतन संचालक मंडळाने चालविण्यासाठी करारावर घेतला असल्यासची माहिती देण्यासाठी तानाजीराव पाटील यांनी पत्रकार बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी दत्तात्रय पाटील, साहेबराव पाटील, बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी, बाळासाहेब होनराव, उपसभापती राहुल गायकवाड, राजेश नांगरे, मुन्ना तांबोळी आदी उपस्थित होते. यावेळी तानाजीराव पाटील यांनी बंद असलेला साखर कारखाना, पाच वर्षे जिल्हा बँकेत असतानाही कारखाना पुन्हा सुरू करण्यात तात्कालीन सत्ताधार्यांना आलेले अपयश, किंबहुना तो सुरू करण्यासाठी कसलेच प्रयत्न केले नाहीत, कारखान्याची निवडणूक, कारखान्याची परिस्थिती, कारखान्यातील गायब झालेल्या मोटारी, तलावावरील मोटारी, गायब तांब्याच्या तारा, भंगार आणि बँकेकडून संचालक मंडळाने कशा कायदेशीर मार्गाने कारखाना ताब्यात घेतला या साऱ्याचा आढावा मांडला. ते म्हणाले,'सध्या कारखान्यावर जिल्हा बँकेचा ताबा आहे. संचालक मंडळाने कारखाना चालवण्यासाठी करारावर द्यावा, अशी मागणी केली होती. यावर बँकेचे सल्लागार आणि वकिलांनी सखोल कायदेशीर अभ्यास करून त्यांचे मत घेऊन कारखाना 'लिव इन लायसन' या ऍक्टमधून संचालक मंडळाने पाच वर्षासाठी ताब्यात घेतला आहे. हा कारखाना बँकेने संचालक मंडळाच्या ताब्यात करार करून ताब्यात दिला आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. लवकरच दोन महिन्यांत कारखाना सुरू केला जाईल.' ते म्हणाले,'राजेंद्रअण्णा देशमुख आणि अमरसिंह देशमुख यांनी कारखाना सुरू करण्याच्या आमच्या प्रयत्नात अनेक तक्रारी करून अडथळा आणला. त्याने रजिस्टर द्वारे बँकेला नोटीस पाठवल्या. सदरचा कारखाना आमच्याच प्रायव्हेट कंपनीला द्यावा अन्यथा चालवण्यासाठी देण्याचे टेंडर काढण्यासाठी तक्रार केली. त्यांच्या प्रायव्हेट बाबासाहेब देशमुख कंपनीच्या नावावर कारखाना देण्यासाठी बँकेकडे २०२० मध्ये अर्ज केला होता. त्यावेळी एकच निविदा असल्यामुळे प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे त्यांच्या कंपनीने भरलेले 81 लाख रुपये परत देऊन ती प्रक्रिया रद्द केली होती. कारखान्याच्या निवडणुकीनंतर परत तशीच मागणी केली आहे. मात्र बँकेने सहकार तत्वाला प्राधान्य दिले. सर्व कायदेशीर बाजू तपासून कायदेशीर धोरणातूनच कारखाना सध्याच्या संचालक मंडळाला देण्याचा बँकेने निर्णय घेतला. त्यामुळे आमच्याकडे कारखाना आला असला तरी तो कारखाना चालवण्याची अण्णा-बापूची तयारी असेल तर सहकारी तत्त्वावर ताब्यात देण्यासाठी आम्ही तयार आहोत. बँकेकडून आम्ही कारखाना ताब्यात घेतला. शेतकऱ्यांना दिलेला आम्ही शब्द पाळला आहे आता तुम्हाला चालवायचा असेल तर तक्रारी करत बसण्यापेक्षा चालवा. त्यासाठी सर्व सहकार्य करू मात्र चुकीच्या दिशाभूल करणाऱ्या तक्रारी थांबवा. याने कुणाचेच भले होणार नाही. यामुळे शेतकरी आणि कामगारांचे प्रचंड मोठे नुकसान होणार आहे. गेली पाच वर्षे त्यांचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे आणि अजूनही त्यासाठी तुमचे प्रयत्न असतील तर मात्र आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. तुम्ही सहकारी सूतगिरण स्वतःच्या प्रायव्हेट कंपनीवर विकत घेतली. त्याच धर्तीवर कारखाना ही ताब्यात घेण्याचा प्रयत्न होता. आम्ही सहकारी तत्त्वावर चालवण्यासाठी ताब्यात घेतला आहे. यातून कोण योग्य हे जनतेला कळतं. त्याच दाखवणं वेगळं आणि वागणं वेगळं आहे. चुकीच्या तक्रारीमुळे शेतकरी आणि कामगारांचे नुकसान होणार आहे. यापुढे तक्रारी झाल्यास आम्हाला सूतगिरणीच्या संदर्भात वेगळा विचार करावा लागेल. सहकारी सूतगिरण बँकेकडून स्वतःच्या देशमुख कंपनीच्या नावावर अत्यंत कमी पैशावर घेतली. तिथे प्लॉटिंग केले. चुकीच्या पद्धतीने वागला तर परत सुतगिरण सभासदांची करू. सुतगिरण बँकेच्या ताब्यात घेण्यासाठी लावू नका, असा इशारा दिला. याशिवाय कारखान्यातले आर्थिक व्यवहार, केलेले एडिट, कसलाही संबंध नसलेल्या कंपनींना दिलेले कोट्यावधी रुपये या साऱ्या भानगडीत आम्हाला पडण्याची वेळ येऊ देऊ नका,असा इशारा दिला. बँकेने कारखाना ताब्यात दिल्यानंतर कामगारांच्या आनंद पसरला आहे. पाच वर्षानंतर आज कामगारांनी स्वतःहून भोंगा वाजवला. सत्कार केला.
करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...
अभिनंदन अध्यक्ष, चेअरमन व सर्व संचालक मंडळ
उत्तर द्याहटवाअभिनंदन
उत्तर द्याहटवा