*पारेकरवाडीचे उपसरपंच लालासाहेब डोंबाळे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश; ब्रम्हानंद पडळकर यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न*
पारेकरवाडी (ता. आटपाडी) गावचे उपसरपंच लालासाहेब डोंबाळे यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा प्रवेश सोहळा पार पडला. लालासाहेब डोंबाळे यांच्या भाजप प्रवेशामुळे पारेकरवाडी परिसरात पक्षाची ताकद वाढली असून, स्थानिक पातळीवर भाजप अधिक मजबूत झाली आहे. यावेळी ब्रम्हानंद पडळकर यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले आणि गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते बंडू कातुरे, मदन कातुरे, उत्तम बरकडे, आप्पा बरकडे, अंकुश डोंबाळे, सचिन खिलारी, दशरथ चवरे, सुरेश भानुसे, मारुती पाटील यांच्यासह विविध स्तरांतील मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रवेशानंतर लालासाहेब डोंबाळे यांनी बोलताना सांगितले की, "पक्षाची ध्येयधोरणे आणि ब्रम्हानंद पडळकर साहेबांचे नेतृत्व मानून आपण जनसेवेसाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे." या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा