आटपाडी---जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे वाहू लागताच आटपाडी तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. करगणी (ता. आटपाडी) येथील पाटील मळा भागात भारतीय जनता पार्टीला मोठे खिंडार पडले असून, येथील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. या पक्षबदलामुळे तालुक्यातील भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.आटपाडी तालुक्याचे शिवसेना नेते तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा प्रवेश सोहळा पार पडला. यामध्ये पाटील मळा येथील युवा नेते अमोल सरगर, नवनाथ सरगर, दामोदर सरगर, बाबू सरगर, धनाजी पाटील यांच्यासह त्यांच्या असंख्य समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केला. तानाजीराव पाटील यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर असतानाच पाटील मळा सारख्या महत्त्वाच्या भागातून कार्यकर्त्यांनी शिवसेना जवळ केल्याने राजकीय वर्तुळात याची मोठी चर्चा होत आहे. या प्रवेशामुळे करगणी परिसरात शिवसेनेची ताकद वाढली असून भाजपसाठी हा चिंतेचा विषय ठरत आहे.
या पक्षप्रवेशावेळी करगणी गावचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय पाटील (पंच), निंबवडेचे सरपंच बाळासाहेब मोटे, करगणीचे माजी सरपंच गणेश खंदारे, युवा नेते मंगेश सस्ते यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा